डॉ पंजाबराव देशमुख व्यक्ती नव्हे एक विचार.
प्रा. कीर्ती काळमेघ
(डॉ. पंजाबराव देशमुख शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष व्याख्यानमाला)
डॉ पंजाबराव देशमुख एक व्यक्ती नसून विचार आहेत.त्यांनी केलेले कार्य अजरामर असून सामाजिक,सांस्कृतिक शैक्षणिक,आणि राजकीय अशा चारही क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य अलौकिक असून त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान लाभले आहे.शेती,माती, शिक्षण याविषयीचे आणि कृषी क्षेत्रातले त्यांचे भरीव योगदान असून घटना समितीमध्ये सुद्धा त्यांनी कार्य केले आहे.त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानामुळे आज महाराष्ट्रामध्येआमुलाग्र बदल घडून आला आहे असे उदगार प्रा.कीर्ती काळमेघ यांनी व्यक्त केले.श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय वाशिम येथे डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित व डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती द्वारा व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.त्यानिमित्ताने यावेळी व्यासपीठावरून प्रा. कीर्ती काळमेघ वनकर बोलत होत्या. होते.भाऊसाहेबांच्या 125 व्या जयंतीनिमित्य 125 व्याख्यानाचे आयोजन संपूर्ण भारतभर करण्यात आलेले आहे. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ, किशोर वाहने , श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती चे प्राचार्य डॉ.शशांक देशमुख प्रा.जयश्री कडू ज्येष्ठ प्रा.डॉ.संजय साळविकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षणमहर्षी कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.यानंतर श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती तर्फे श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयास डॉ.पंजाबराव देशमुख यांची प्रतिमा व त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.डॉ. शशांक देशमुख यांनी भाऊसाहेबांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला .त्यानंतर प्रा. कीर्ती काळमेघ यांनी भाऊसाहेबांच्या चौफेर व्यक्तिमत्त्वाचा ,त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करून विद्यार्थ्यासमोर त्यांची विचार मांडले आणि त्यातून जीवनात ध्येयप्राप्तीसाठी व लक्ष गाठण्यासाठी व या समाजाचा विकास करण्यासाठी युवकांनी योगदान द्यावे आणि भाऊसाहेबांच्या विचाराचा वसा आणि वारसा चालवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर वाहाने यांनी भाऊसाहेबांच्या कार्याची उजळणी करत विद्यार्थी ,प्राध्यापक शिक्षक व समाज या सर्वांनाच आज त्यांच्या विचारांची गरज असून आजही समाजामध्ये अनेक समस्या असून त्या सोडण्यासाठी
भाऊसाहेबांच्या विचारांची गरज आहेअसे प्रतिपादन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संजय साळविकर,सूत्रसंचालन प्रा. गजानन बारड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. वसंत राठोड यांनी केले ,या कार्यक्रमाला श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय अमरावतीचे श्री विशाल अढाऊ,
महाविद्यालयाची सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी आणि संपूर्ण विद्यार्थी बहुसंख्येने तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)