माहेश्वरी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

माहेश्वरी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

अमरावती येथील श्री गणेश दास राठी छात्रालय समिती द्वारा संचालित माहेश्वरी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला
याबाबत सविस्तर वृत्त असे की श्री. गणेशदास राठी छात्रालय समिती अमरावती द्वारा संचालित माहेश्वरी कनिष्ठ महाविद्यालय अमरावती येथे कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मोहन पांडेसर व श्री गणोरकरसर यांच्या मार्गदर्शनात नुकताच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.अडगावकर तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा.विद्या बोंडे (जाधव) उपस्थित होते तर मंचावर प्रा.सुरज इंगळे प्रा. स्मिता दोडके प्रा. ऋचाली दिगंबर उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमापूजनाने करण्यात आली यावेळी प्रा. विद्या बोंडे व प्रा. सुरज इंगळे यांनी आपले मत व्यक्त केले शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात स्वयं शासन पद्धतीने वर्ग चावलेले
कार्यक्रमाचे संचलन कु.नंदिनी इंगळे तर आभार प्रदर्शन कू.फराह काझी यांनी केले

Spread the love
[democracy id="1"]