श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा
5 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतात भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणूण साजरा करण्यात येतो. याच अनुषंगाने श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला सलग्नीत श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती येथे विद्यार्थ्यांच्या प्रचंड उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशांक देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. दिनेश देशमुख, प्रा. सौ. जयश्री कडु, प्रा. सौ. मिरा पांडे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व शिक्षणमहर्षी कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख प्रतिमेचे पूजन, हारअर्पण करून दीप प्रज्वलन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. यावेळी कु. संयुक्ता देशमुख, कू. निकीता इसळ, कू. जान्हवी सोनुले, कू. गायत्री वाठोडकर, श्री. यश ठाकरे
यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. महाविद्यालयातील प्रा.सौ.शितल चितोडे यांनी कविता सादर केली तर प्रा.सौ.कल्पना पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी विद्यार्थ्यांतर्फे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन कू. ट्विंकल सिनगारे, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कू. प्रतीक्षा गोरेलू यांनी केले.यावेळी महाविद्यालयात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये विजयी व उपविजयी झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रक्षेत्रावरील कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love
[democracy id="1"]