अंजनगाव सुर्जी तालुक्यातील साखरी परिसरातील पिके पाण्याअभावी कोरपली
महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी:
गेल्या एक महिन्यापासून पावसाने गैरहजेरी लावल्यामुळे साखरी परिसरातील शेतकऱ्यांची पिके पूर्णतः वाळून गेलेली आहेत. आधीच पेरणी उशिरा झालेली आहे आणि त्यामध्ये पावसाने एक महिन्यापासून गैरहजेरी लावल्यामुळे संपूर्ण सोयाबीन,कपाशी,तूर हे पिक उन्हामुळे जागीच वाळत आहे. बोर,विहिरी यामधील सुद्धा पाणी कमी झालेले आहे आता शेतकऱ्याकडे पर्याय उरलेला नाही विमा कंपनीने शेतकऱ्यांना विमा द्यावा तसेच अंजनगाव सुर्जी तालुका हा कोरडा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करण्यात यावा. जनावरांना सुद्धा चारा नाही आहे शेतामध्ये जे गवत निघाले होते तेसुद्धा पाण्याअभावी सुकले आहे. यावेळी कृषीसेवक बोंडे तसेच विमा कंपनीचे प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन सर्वेक्षण केले आहे, त्यांच्याकडे शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी साखरी येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश नाकट,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विशाल पंडित साखरीचे उपसरपंच वासुदेव डांगे, चंचल पंडित, संजय गायकवाड, जनार्दन नवरंगे, अनिल डवले,अमोल पंडित यांनी केली आहे.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)