अंजनगाव सुर्जी तालुका कोरडा दुष्काळ जाहिर करा

अंजनगाव सुर्जी तालुका कोरडा दुष्काळ जाहिर करा

प्रहार विद्यार्थी संघटनेचे शाम धुमाळे यांची शासनास मागणी

अमरावती विभाग
महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी:

पाऊसच नसल्याने अंजनगाव सुर्जी तालुक्यात कोरडा दुष्काळाची भीषणता जाणवू लागली आहे. सुरुवाती पासूनच सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्याने कोरड्या दुष्काळाचे चित्र स्पष्ट झाले आहे. कर्जाने पैसे घेवून शेतकर्‍यांनी आपल्या शेताची मशागत केली, पेरणी केली, काही शेतकर्‍यांनी तर दुबार पेरणी केली. काही ठिकाणी पिके जेमतेम जमिनीबाहेर आले. मात्र पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली तर तीच पिके करपू लागली आहेत. आता तिबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांवर आले आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात गेल्या 25 दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात पाऊसच नसल्याने कपाशी, ज्वारी, तूर, सोयाबीन, उडीद, मुग, संत्रा, केळी यांच्यासह खरीपातील विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अर्थातच खरीप हंगाम शेतकर्‍यांच्या हातचा गेला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आवाहना नुसार शेतकर्‍यांनी खरीप पिकांचा विमा काढलेला आहे. दुष्काळीसदृश्य परिस्थिती आणि मध्य हंगामातील प्रतिकूलता जाहिर करुन शासनाने विमा कंपनीला शेतकर्‍यांना 25 टक्के अग्रीम रक्कम तात्काळ देण्याबाबत सूचना करावी, अशी प्रहार विद्यार्थी संघटनेचे शाम धुमाळे यांनी महाराष्ट्र शासनास केली आहे. 25 टक्के अग्रीम रक्कम दिल्यास शेतकर्‍यांना दिलासा मिळाणार असल्याचे शाम धुमाळे यांनी म्हटले आहे.

Spread the love
[democracy id="1"]