हर हर बोला महादेवाच्या गजरात दुमदुमली पणज नगरी

हर हर बोला महादेवाच्या गजरात दुमदुमली पणज नगरी

संजय गवळी आकोट तालुका प्रतिनीधी

अकोट तालुक्यातील ग्राम पणज येथे श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी दिनांक 28 ऑगस्ट 2023 ला सार्वजनिक शिवभक्त मंडळ व समस्त गावकरी पणज च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पूर्णा नदीवरून जल आणून डीजेच्या तालावर थिरकत व हर हर महादेव या जय घोषाणे गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली महादेवाला जलाभिषेक करून मस्जिद जवळ मुस्लिम बांधवाच्या वतीने कावड यात्रेचे यावेळी स्वागत करण्यात आले दरघाह वर पोलीस अधिकारी सुरज गुंजाळ विजय दातीर युवा उदोजक आकाश कोल्हे सरपंच यांच्या हस्ते चादर चढविण्यात आली याठिकाणी हिंदू मुस्लिम समाजातील नागरिक उपस्थित होते त्यानंतर पोलीस अधिकारी यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला मिरवणूक शांततेत पार पडली शेवटी विजय स्टोन क्रशर येथील महादेवाच्या मंदिरात जलाभिषेक व आरती करून विजय दातीर यांच्या कडून सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भावीक भक्तांनी मोठ्या संख्येने दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला पोलीस अधिक्षक सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश जउळकर आठवले पोलीस कर्मचारी यांनीं पणज नगरीत कावळ यात्रे दरम्याण ग्रामीण पोलीस स्टेशन आकोट यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता हर हर बोला महादेव च्या जय घोषाने पणज नगरी दुमदुमुन गेली होती डिजेच्या तालावर भावीक व तरुनाई यांनी मिरवणुक आनंदात पार पाडली यावेळी सार्वजनिक शिवभक्त मंडळ तथा गावकरी मंडळी यांनी मोलाची भुमीका बजावली असुन मोठ्या संखेने भावीकांची व पणज ग्रामस्थांची उपस्थिती होती

शिवसेना नेत्यांनी दिली कावड यात्रेला भेट
जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांच्या सह अकोट तालुक्यातील शिवसेना नेत्यांनी पणज येथील कावड उत्सवात सहभागी होऊन कावड चे पूजन केले नंतर डीजेच्या तालावर थिरकले

Spread the love
[democracy id="1"]