वाचन संस्कृति वाढविणे
काळाची गरज
आपल्या सर्वाना माहित आहे आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे आज कालच्या काळात इलेक्टॉनिक संसाधनांचा वापर हा खुप वाढलेला आहे संगणक, टीव्ही, इंटरनेट आणि सर्वात महत्वाचा व सर्वांना आपुलकिचा वाटनारा म्हणजेच मोबाईल सर्वानकडे आपल्याला आजकाल मोबाईल हा पाहायला मिळती मोबाईल हा लाहान मुलाण पासून तर सर्व मोठ्या माणसान पर्यंत स्वतःचा मोबाईल असतो. मोबाईल मुळे सर्व काही है। खुप : सोप झाले आहे कोणती पण गोष्ट हवी असली किवा कोणतीपण माहीती हवी असली ते सहज पणे व ऐका सेंकद मध्ये इंटरनेट च्या साहायाने मोबाईल वर मिळते. या कारणा सहसा विद्यार्थी हे ग्रंथालया मध्ये पुस्तक वाचनकरण्यासाठी साठी जाताना आपल्याला दिसत नाही. इंटरनेट वरिल महिती ही कीतपर्यंत खरी आहे हे तर मी सांगू शकणार नाही पण पुस्तक
मधून वाचन केलेले आपण सहसा विसरू शकत नाही हे मात खर आहे पण आजकालच्या सर्व विद्यार्थि यांना खंर समजायला हवे की
पुस्तका येवढे ज्ञान हे आपल्याला मोबाईल हे कधिच देऊ शकनार नाही. आपण पूर्वी पासुन एक म्हण ऐकत आलेलो आहे “वाचाल तर वाचाल” या म्हण पासुन खुप काही शिकायला मिळत खर तर हे म्हण ज्याणि पण लिहली असणार त्याना विद्यार्थी यांना खुप काही सांगायच असणार. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. या काळात संसाधनाचा वापर खूप वाढलेला आहे तसेच इंटरनेट आणि मोबाईल दैनंदिन वापरातील बाबि झाल्या आहे पण कोणत्याही वस्तूची अतिवापरामुळे त्याचे दुष्परिणाम पण होत असतात तसेच मोबाईल व आधुनिक यंत्रामुळे समाजातील सर्व लोक हे पुस्तक व वाचना पासुन दुर होताना आता दिसत आहे. तेवढेच नाही तर आज शहरा तील खाजगी शाळांमधील विद्यार्थीवरचा अभ्यासाचा ताण व महाविद्यालयीन युवकांचे मोबाईल बेड बिझी शेड्युल यातुन या सर्वाना अवांतर वाचनाची संधी भेटायला हवी अशी संधी उपलब्ध करून देव्या साठी आई-वडिल / पालकानी सतत प्रयत्न शील असायला हवे. मोबाईल मुलांच्या हातात देव्या पूवी त्यांना- लहाणपणा पासुनच. गोष्टींची पुस्तके देऊन वाचन करण्या साठी- जागृत करण्याचा प्रयत्न पालकांनी करायला हवा.
समाजातिल लोकाना वाचनाचे महत्व समजवले पण खूप म्हत्वाचे आहे. वाचन करणे व पुस्तक समजुन घेणे हे काळाची गरज आहे. आजपर्यंत जे महापुरुष घडले ते फक्त शिक्षणामुळे आणि वाचना मुळे. उदाहरण जर सांगायचे झाले क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना शिक्षण घेण्यासाठी प्रचंड विरोध झाला पण ते खुप हट्टीने शिक्षीत झाले. शिक्षीत असल्यामुळे ते पुण्यात जिथ राहत होते त्या मुस्लिम मोहल्ल्यात कबीर बीजक नावाचा ग्रंथ वाचण्यासाठी. केवळ वाचता यते म्हणुन महात्मा फुले यांना बोलावले जायचे व त्याच प्रमाणे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच ग्रंथप्रेम सर्व जगाला माहीतच आहे. बाबासाहेब यांचे वडिल सुबेदार रामजी आंबेडकर यांनी बाबासाहेब यांच्या वाचनाकडे विशेष लक्ष दिले होते. वाचनामुळे बाबासाहेब विश्वातील एक प्रज्ञावंत विद्वांन मनून
ओढकले गेले.
आजचा विचार करताना वाचनासाठी पालक वर्ग कीती – जागृत आहे हि चिंता करणारी बाब आहे. अध्ययनासाठी वाचन हे अतिशय महत्वाचे कौशल्य आहे असे मला वाटते. सध्याच्या बदलत्या परिस्थितीत व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती ही विसरून चालणार नाही. तुम्हा सर्वाना एक गोष्ट सांगायच झाली तर मि एक विद्यार्थी त्या मध्ये पण सांगायच झाल तर मी अमरावती व मुळचा विदर्भाचा मी काही कामा निमित्य पुणे व मुंबई ला गेलो असता मला तेथील विद्यार्थि मला खुप वेळा माझा भाषा वरून मला म्हणत कसा बोलतोस रे तु खर तर हे मुलं आपल्याला असे का म्हणतात हे मला नंतर माहीत पेडल कारण ते मुल जे काही शब्द बोलता होते ते शब्द मि पाहले नव्हते खर तर मि वाचले नव्हते कारण माझे वाचन हे नव्हते. खर तर आम्ही ग्रंथालयात जाऊनच पाहत नाही तर वाचन तर खुप दूर चि गोष्ट आहे. खर तर आम्हा विद्यार्थांची अडचणचं हे आहे. आम्ही ग्रंथालयात जात नाही. वाचनाची आवड मुलाणा शाळेत दाखल होण्या अगोदर घरूनच लागायला पाहीजे. आजकाल ज्यांच्या पण घरी लाहान बाळ किवा 5 कीवा 7 वर्षाचा मुलगा किवा मुलगी असणार तर तेथिल आई चि एकच तक्रार तुम्हाला दिसुन येणार, आमचा मुलगा व मुलगी हातात मोबाईल दिल्याशिवाय व टीव्ही चालू केल्या शिवाय जेवतच नाही. पण त्यावर माझा प्रश्न आहे
त्याले मोबाईल आणि टीव्ही दाखला कोण ? त्याने स्वःता मागितला होता का? हे सर्व पालक व आई वडिलांनीच त्यांना दिल आहे त्या
‘ऐवजी रंगीत चित्रांचि पुस्तक त्याच्या समोर ठेवा. त्याना ते बघु द्या. त्या पुस्तकातिल आकार रंग त्यांना आवडतील त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न ते मुले करणार, व त्यापासून मूल हे शिकणार व कल्पना करणार वाचन करणार. मागिल पिढीपेक्षा आताच्या पिठीचे वाचन अगदी कमी झाले आहे आपल्या सर्वाना वाचन संस्कृति टिकवून ठेवण्याचि खुप गरज आहे. प्रत्येक माणसाला आतुनच वाचणाचि आवड निर्माण करायला हवी. जुन्या पिढी मोबाईल व तंत्रज्ञान वस्तु नसल्याने ते वाचनातून आपले ज्ञान वाढवत असत. मात्र आज वाचनासाठी अनेक साधने उपलब्ध असुनही तरुण पिढी वाचणा पासुन दूर जात आहे. नविन पिठी हे दिवसान दिवस मोबाईल व इंटरनेट च्या वापराने वाचना पासुन दूर जाताना आपल्याला दिसत आहे. आपल्या आयुष्यावर दोन गोष्टीचा खूप प्रभाव पडतो. एक आपले मित्र आणि म्हणजे पुस्तक, पुस्तक आणि वाचन हे आपल्या जिवणाला नवीन दिक्षा देण्याच काम करते, एखाद्या गोष्टीचा आपल्याला अनुभव नसला तर आपण तो पुस्तकाच्या व वाचन च्या माध्यमातून घेऊ शकतो असे मला वाटते. समाजात वाचन संस्कृती वाढविने ही खरोखर काळाची गरज झाली. मि अगोदर म्हटले आपल्या आयुष्यावर दोन गोष्टीचा खुप प्रभाव पडतो पहिला म्हणजे मीत्र आणि दुसरे म्हणजे पुस्तक. जर आपली मैत्रीच ‘ पुस्तक सोबत झाली तर
हि गोष्टकाल्पनिक रित्या न पाहता आपण ते करून पाहायला पाहीजे आपण आपल्या मित्राणा जेवढा वेळ देतो तेवढा वेळ पुस्तक व वाचन करण्याला देला तर आपली विचार करण्या ची शमता वाढेल आपल्या मध्ये वाचनाची आवड निर्माण होणार. आता फक्त आपण वाचन चालू केले म्हणजे झाले का नाही नुसता वाचनाने माणूस हा मोठा होत नाही जे काही वाचतो आपण आपल्या जिवनात अनुभवल पण पाहीजे. आपण महाराष्ट्र मध्ये राहतो आपल्या महाराष्ट्र मध्ये अनेक लेखक कवि आहे. किती थोर पुरुषांची आत्मचरित्र, कथा, कादंबरी
लिहिली आहे. आपल्या मध्ये वाचन व पुस्तक यांची आवड निर्माण झाली तर एखादे पुस्तक हे आपले आयुष्य बदलु शकते. पुस्तका पासुन व वाचना पासून आपण आपले व्यक्तीमत्व निर्माण करू शकतो. आपल्या व्यक्तीमत्वा मध्ये विकास करू शकतो. पुस्तकामधिल एखादे पान आपल आयुष्य बदलु शकत. एवढी ताकत हे वाचना मध्ये आहे तर आपण यावर विचार नक्कीच केला पाहिजे व वाचन करण्यास सुरुवात केली पाहिजे आजच्या जिवन पद्धती मुळे व बाहेरील देशातील संस्कृती मुळे आपल्या कडील वाचन संस्कृती थोडी मागे पडू लागली आहे मला असे वाटते.
मि एक समाजकार्यकर्ता म्हणून लोकाना वाचणाचे महत्त्व समजुन सांगु शकतो पण वाचनाचि आवड हि लोकाना स्वतः मध्येच निर्माण करावी लागणार. आपण आपली वाचन संस्कृति वाढविली पाहीजे वाचवली पाहीजे ही काळाची गरज आहे. सर्व विद्यार्थी वाचणास व पुस्तकास महत्व देण्यास सुरवात केली पाहीजे. पालक वर्गाणि मुलाणा मोबाईल व रिमोट ऐवजी पुस्तक दिले तर त्याचा रिकामा वेळ वाचना मध्ये जाईल व हळूहळू वाचन वाढत – जाईल. आपण एक नविन संकल्प केला पाहीजे दिवसातून एक किवा दोन तास तरी वाचन केले पाहिजे. आपण आपला वाचन संस्कृति वाढवली पाहिजे आणि वाचवली पाहिजे. चला एक पाउल पुढे टाकुया आणि वाचन संस्कृति वाढवूया..
हिरवे पाण कधीतरी पिकणारच पिकल पाण कधीतरी गळणारच आणि वाचण केले तर काही ना काही तरी मिळणारच..
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)