अमरावती विभागीय जनसंवाद यात्रा नियोजन बैठक. माजी मंत्री तथा विरोधी पक्षनेते आ.विजयजी वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस भवन अमरावती येथे संपन्न.
या बैठकीत येत्या काळात होऊ घातलेल्या भारत जोडोच्या धर्तीवर आधारित जिल्हा निहाय यात्रा व त्यांचे नियोजन या बैठकीमध्ये करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने – मा.आमदार यशोमतीताई ठाकूर ( माजी पालकमंत्री अमरावती ) , मा.आ. सुनीलभाऊ देशमुख , मा. अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख ( अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी अमरावती ) , मा.आ. वीरेंद्रभाऊ जगताप , मा. आमदार बळवंतभाऊ वानखडे ( दर्यापूर-अंजनगाव सुर्जी विधानसभा क्षेत्र ) , मा.आ.आमदार राजेश ऐकडे , मा.आमदार वजाहत मिर्झा , मा.आ. राहुल बोंद्रे तसेच अमरावती विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष तसेच युवक काँग्रेस चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या आढावा बैठकीस प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)