पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध तहसीलदार यांना निवेदन सादर

पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध तहसीलदार यांना निवेदन सादर

संजय गवळी आकोट तालुका प्रतिनीधी

पत्रकारांवर
झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात येवून तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार महाजन यांच्या वर नुकतीच भ्याड हल्ला केल्याची घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर बाळापूर तहसीलदार यांना राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटन बाळापूर तालुक्याच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे तर निवेदनात पत्रकारांना संरक्षण मिळावे यासाठी पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आल्यानंतरही राज्यातील पत्रकारांवरील हल्ले वाढतच आहेत असल्याचे काही घटनांवरून दिसून येते पत्रकार संरक्षण कायद्याची राज्यात अंमलबजावणी का होत नाही हा कायदा कुचकामी का ठरत आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे पत्रकारांवरील होत असलेले भ्याड हल्ले निषेधार्थ असून पत्रकारावर भ्याड हल्ला करणाऱ्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी तहसीलदार यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आली आहे तर तहसीलदार यांना निवेदन सादर करतेवेळी राजकुमार चिंचोळकर भिमकीरण दामोदर देवराव परघरमोर लुकमान शाह हारुण भाई देशमुख संतोष मोरे राधेश्याम कळसकर श्रीकृष्ण पवार यांच्या सह राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटन चे बाळापूर तालुका तसेच जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते

Spread the love
[democracy id="1"]