अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयातील कोतवाल बुक विभागाला आग‌..

अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयातील कोतवाल बुक विभागाला आग‌..

अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याचा अंदाज…

अमरावती विभाग
महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी:

अंजनगाव सुर्जी येथील तहसील कार्यालयातील कोतवाल बुक नक्कल असलेल्या खोलीला आग लागल्याचे उघडकीस आले.
सविस्तर माहिती नुसार रविवार रोजी कार्यालयाला सुट्टी होती सकाळी दहा दरम्यान व तहसील कार्यालयातील कोतवाल बुक नक्कल विभाग ची खोली मुख्य इमारत पासून वेगळी असून या खोलीला आग लागल्याचे माहिती मिळाली आहे ही आग नेमकी केव्हा लागली याचा अंदाज घेता आला नसून या खोलीत असलेले महत्त्वाच्या दस्तऐवजासह तेथील काही लाकडी फर्निचर जळाल्याचे माहिती नायब तहसीलदार रवींद्र काळे यांनी सांगितले त्यांनी सांगितल्यानुसार दस्तऐवजामध्ये 2020 मध्ये निकाली निघालेल्या केसेस जळाल्याची माहिती मिळाली.

तहसील कार्यालयाला नाही कायमस्वरूपी चौकीदार

तहसील कार्यालयाला कायमस्वरूपी चौकीदार नसून रात्रीला कार्यालयात एकही चौकीदार नसतो. तसेच जळालेल्या खोली च्या खिडकीच्या काचा फुटलेल्या असून त्यामुळे कोणत्यातरी समाजकंटकाने हा अनुसूचित प्रकार घडवला असल्याचा अंदाज वर्तविला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक एस पी पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली असून त्या ठिकाणच्या खिडकीच्या काचा फुटलेल्या आढळल्या असून तहसील कार्यालयाने तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
परंतु काही महिन्या आधी अंजनगाव सुर्जी तहसिल कार्यालयातुन गोपनीय अहवाल गायब झाले होते त्याच्या बातम्या सुध्या प्रकाशित झाल्या होत्या त्यानंतर तहसिल कार्यालयाला आग लावणे म्हणजे काही तरी कोण्या तालुक्यातील मोठ्या हस्तीने किंवा तहसिल कार्यालयात काम करणारे यांनी तर केले नसावे, तसेच अजुन पर्यंत तहसिल कार्यालया कडून गोपनीय अहवाल गायब असल्याची फिर्याद पोलीस स्टेशन अंजनगाव येथे दाखल केले नाही नेमके पाणी कोणत्या जमिनीत मुरते याची चर्चा फक्त चर्चा चालु असल्याची आता तालुक्यांतील नागरीक करीत असुन पुढील तपास अंजनगाव सुर्जी पोलीस करीत आहेत.

Spread the love
[democracy id="1"]