श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती येथील कॅक्टस गार्डन चे उद्घाटन

श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती येथील कॅक्टस गार्डन चे उद्घाटन
श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला सलग्नित श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती येथे कॅक्टस गार्डन चे उद्घाटन भारतीय गुलाब परिषदेच्या सदस्या तथा माजी अध्यक्षा अमरावती गार्डन क्लब सौ. निर्मलाताई देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती चे कोषाध्यक्ष मा. श्री. दिलीपबाबू इंगोले उपस्थित होते. प्रमूख अतिथी म्हणून महानगर पालिका आयुक्त मा. श्री. देविदास पवार ,सहाय्यक आयुक्त मा. श्री. भूषण पुसतकर , उद्यान अधीक्षक मा. श्रीकांत गिरी, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीचे आजीवन सदस्य मा.श्री.अशोकराव देशमुख, प्रा.चंद्रशेखर देशमुख तसेच श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती चे प्राचार्य डॉ. शशांक देशमुख उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षणमहर्षि कृषिरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले. नंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत पुष्पकुंडी देवून करण्यात आले. श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाच्या पदवी अभ्यासक्रमात कॅक्टस जातीतील विविध प्रजातींचा अभ्यास असल्यामुळे या अभ्यासपूरक व पर्यावरण पूरक अशा कॅक्टस गार्डन ची निर्मिती करण्यात आली. या गार्डनमध्ये वीस विविध प्रकारच्या कॅक्टस बघावयास उपलब्ध आहेत.महाविद्यालयीन तसेच शाळकरी विद्यार्थी यांना उपयुक्त अशा कॅक्टस गार्डनच्या निर्मिती करीता फुलशेती व प्रांगण उद्यान विभाग प्रमूख प्रा. सौ. शितल चीतोडे , कनिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. मिलिंद देशमुख, श्री. अतुल वानखडे, श्री. विलास पडोळे, श्री. गजानन वाकोडे यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
[democracy id="1"]