BIG BREKING
आज अमरावतीकर मोदींजीना ऑनलाईन भेटले,लवकरच मोदींजीना अमरावतीला आणून बडनेरा व्यागन कारखाना,चिखलदरा स्काय वॉक व बेलोरा विमानतलाचे लोकार्पण करणार_खासदार सौ नवनीत रवी राणा यांचे जिल्हावासियाना अभिवचन
खासदार सौ नवनीत रवी राणा यांच्या अथक प्रयत्नांनी अमरावती_बडनेरा वासियांना अनुभवता आले अदभुत अविस्मरणीय ऐतिहासिक क्षण,देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते अमृत भारत योजनेअंतर्गत बडनेरा रेल्वे स्थानक पुनर्विकास भूमिपूजन व्हिडीओ कॉन्फरन्सिंग पद्धतीने भूमिपूजन संपन्न
कार्यसम्राट खासदार सौ नवनीत रवी राणा यांच्यामुळेच अमरावतीत 10 हजार करोड चा मेगा टेक्सटाइल पार्क,आमदार रवी राणा व खासदार सौ नवनीत रवी राणा यांच्या पाठीशी आपण भक्कम पणे उभे राहणार_राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे यांचे जाहीर अभिवचन
बडनेरा मतदार संघ माझा परिवार,या मतदार संघाला सर्व सुविधांनी विकसित करून क्रमांक एकचा बनविणार_आमदार रवी राणा यांचा निर्धार
देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव,राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून बडनेरा रेल्वे स्टेशन जागतिक दर्जाचे बनविण्यासाठी आज भव्य भूमिपूजन समारंभ पार पडला,यावेळी मंचावर राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे,खासदार सौ नवनीत रवी राणा,आमदार रवी राणा,मध्य रेल्वे भुसावळ चे एडीआरएम सुनील कुमार सावन,श्री शुक्ला साहेब,सिनियर डीसी एम श्री पाठक, डीएसटी श्री शंकधर यांच्यासह समाजसेवक श्री सुदर्शनजी गाग,चंद्रकुमारजी जाजोदिया,लईक पटेल, नानकराम नेभनानी,चेंबर ऑफ कॉमर्स चे विनोद कलंत्री,भाजपा चे शिवराय कुलकर्णी,दिनेश सूर्यवंशी,संजय तिरथकर,मंगेश खोंडे,युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितु दुधाने,शहर अध्यक्ष संजय हिंगासपुरे,माजी सैनिक संघाचे रॉय काका आदी उपस्थित होते
बरोबर 11 वाजता पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी कोनशिला अनावरण केले,आणि उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांच्या कडकडाट केला,सर्व उपस्थितांनी पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी यांचे संबोधन अत्यंत मनपूर्वक शांत चित्ताने ऐकून या भव्य दिव्य कार्यक्रमाचा आस्वाद घेतला, एकाच वेळी देशातील 508 रेल्वे स्थानकांच्या भूमिपूजन त्यात आपल्या अमरावतीचे बडनेरा रेल्वे स्थानकाचा समावेश होणे हे खासदार सौ नवनीत रवी राणा यांच्या अथक प्रयत्नाने झाले असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या,यावेळी आयोजित निंबंध स्पर्धेचा बक्षीस समारंभ खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांच्या हस्ते पार पडला,सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कला गुंनाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली
रिमझिम पावसात सुरू असलेल्या या कार्यक्रमाला जवळपास 5 हजार नागरिकांची उपस्थिती होती,बडनेरा रेल्वे स्टेशन आता नव्याने रूप धारण करून सर्व सुख सोयी युक्त होणार असल्याने खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी,केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव,केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे,मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री श्री अजित पवार,खासदार डॉ अनिल बोंडे,आमदार रवी राणा यांचे आभार मानले, व उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल रेल्वेचे अधिकारी,कर्मचारी यांचे अभिनंदन सुद्धा खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी यावेळी केले
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)