अडगाव बु येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

अडगाव बु येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

प्रतिनिधि
संजय भटकर
अडगाव बु ,

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १ ऑगस्ट रोजी १०३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी शोभायात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. बाजार पुरा येथून या भव्य शोभयतरेला सुरुवात झाली. तत्पूर्वी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समितीचे अध्यक्ष देवानंद धुरदेव यांच्या हस्ते रथावरिल अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य तैल चित्राचे पूजन करण्यात आले पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच त्यांना जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यानंतर या शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली .ही शोभायात्रा सितामातापुरा,मानकरपुरा,भोपळे पुरा,शिवाजीनगर ,लालमारोती चौक ,गांधी चौक या मुख्य रस्त्याने काढण्यात आली. ठिकठिकाणी या शोभयतरेचे स्वागत करण्यात आले.
माहात्मा फुले चौक व
लालमोरोती चौक येथे प्रतिमेचे पुजन करण्यात आले
यावेळी,शिवाजी नगर चे संरपंच सौ.गायञी चिम ,उपसंरपंच गुलाम आरिफ ,पोलीस पाटील हितेशकुमार हागे ,पत्रकार अशोक घाटे,हेमराज काळपांडे ,उमेश राहटे,अमोल खंडारे ,प्रञकार संजय भटकर,दिपक खंडारे,प्रदिप सावळे, सुधाकर उंबरकार , अंबादास भटकर,
नागेश तायड़े,निखिल खंडारे
किसन गवई,गुलाब अवचार
,प्रदीप क्षिरसागर,सुनील अवचार
आदी मान्यवरांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
गावातुन काढण्यात आलेल्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या या शोभायात्रेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते.
यावेळी हिवरखेड पोलीस स्टेशन ठाणेदार विठ्ठल पांडव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, अनंत मुळे ,शिवा गावंडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता

Spread the love
[democracy id="1"]