अकोला ते गांधीग्राम बस सुरू विद्यार्थ्यांन मध्ये आनंदाचे वातावरण.
पुर्णाजी खोडके यांचे मागणीला यश.
अकोला ते गांधीग्राम रोडच्या एसटी बस बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत . होते, अकोला ते गांधीग्रामपर्यंत बस सेवा ही पहिले सुरु होती, नंतर बंद करण्यात आली होती.
अकोला ते गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या चार कोटीच्या पुलावरून पाणी गेले व हा मार्ग बंद करण्यात आला होता. तसेच पर्यायी मार्ग म्हणून गोपालखेड येथून चालू करण्यात आला होता. परंतु सदरच्या मार्गावरून एसटी बसेस बंद आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते,तसेच बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत पास आहेत, तसेच महिलांना अर्ध्या तिकिटाची सवलत, वृध्द नागरिकांना एसटी फुकट प्रवास आहे,
एसटी बस बंद असल्यामुळे नुकसान होत होते,तसेच अकोला ते गांधीग्रामपर्यंत एसटी बसेस सुरू करण्यात याव्या, जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. अशी मागणी रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ पश्चिम प्रभारी युवा अध्यक्ष पुर्णाजी खोडके यांनी केले होती. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अकोला व्यवस्थापक, अकोला विभाग नियंत्रक विभागीय, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आगर, अकोला आयुक्त यांच्याकडे निवेदन देऊन केली होती, तसेच आज दिनांक दोन ऑगस्ट पासून अकोला ते गांधीग्राम पर्यंत एसटी सेवा तिन टाईम सुरू झाले आहे
पुर्णाजी खोडके यांनी केलेल्या निवेदनाची दखल झाली असून विद्यार्थ्यांन मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.. तसेच जेष्ठ नागरिक व महिला ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी रयत शेतकरी संघटना विदर्भ पश्चिम युवा अध्यक्ष, पुर्णाजी खोडके यांचे आभार मानले खोडके हे अनेक समस्या विषयावर पुढाकार घेत असतात,व त्याचा पाठपुरावा सुद्धा करतात त्या मुळें त्यांच्या अनेक समस्या ना वाचया फोडली आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे…
प्रतिक्रिया.
अकोला ते गांधीग्राम पर्यंत एसटी बस सुरू झाली व ३ टाईम सुरू झाले.
आर जे पाटकर
एसटी बस ड्रायव्हर
मी निवेदन दिले होती, अकोला ते गांधीग्राम पर्यंत एसटी बस सेवा सुरू करण्यात यावे, तसेच आज दिनांक २ ऑगस्ट रोजी अकोला ते गांधीग्राम पर्यंत एसटी बस सेवा,३ टाईम सुरू झाली आहे.
पुर्णाजी खोडके रयत शेतकरी संघटना विदर्भ पश्चिम युवा अध्यक्ष