अतिवृष्टीची नुकसान भरपाई न मिळाल्यास आंदोलनाचा चा इशारा

अतिवृष्टीची नुकसान भरपाई न मिळाल्यास आंदोलनाचा चा इशारा

संजय गवळी आकोट तालुका प्रतिनीधी

आकोट मूर्तिजापूर व बार्शीटाकळी तालुक्यात (ता.१८) च्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजय प्रभे, जिल्हा उपाध्यक्ष पंजाबराव किर्दक, अकोट तालुकाध्यक्ष राजकुमार वानखडे, महिला आघाडी अकोला कार्याध्यक्षा अंतकला जुमळे सह कार्यकर्तेनी दिलेल्या या निवेदनात असे म्हटले आहे की, दिनांक १८ जुलै रोजी रात्री दोन्ही तालुक्यात अतिवृष्टी झाली तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. त्यामुळे नदी, नाल्यांच्या पुराचे पाणी गावात घुसून घरांची पडझड झाली, जनावरे वाहुन गेली. प्रशासनाने पंचनामे करण्यास सुरुवात केली असली तरी यावर्षी पावसाळयाला उशीर झाल्यामुळे जुलै महीन्यामध्ये शेतक-यांनी पिकांची पेरणी केली होती. पावसाला विलंब झाल्यामुळे काही शेतक-यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागला. जेम तेम दुबार पेरणी झाली त्यातच पावसाचा कहर त्यामुळे सगळयात जास्त नदी व नाल्याखाली असलेल्या शेतीचे व रहीवास्याचे नुकसान झाले. या पावसामुळे झालेल्या नुकसानाची मदत शेतक-यांना नुकसान भरपाई त्वरित मिळण्यात यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आंबेडकर) पक्षाच्या वतीने आंदोलनाचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.

Spread the love
[democracy id="1"]