पणज परीसरात समाधान कारक पाऊस शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची प्रतीक्षा
पणज परीसरात वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे
संजय गवळी आकोट तालुका प्रतीनीधी
आकोट तालुक्यातील ग्राम पणज सह बोचरा परीसरात मागील वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा शेतकऱ्यांनी केळी सोयाबीन तुर कपाशी ज्वारी या पिकांका पसंती दिली आहे मागील वर्षी शेतकऱ्यांनी या पैकी काही पिकांना पसंती दिली होती तर काही पिकांनी साथ दिली तर काही पिकांनी दगा दिला असुन शेतकरी राजा चांगल्या पिका करिता लाखो रुपये खर्च करतो परंतु पिक घरी आल्या नंतर अनेक पिकांना भाव नसतो यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाला मातीमोल भावाने विक्री करावी लागतो तसेच शेतीकरीता लागलेला खर्च कधी कधी निघत नसून शेतकरी मोठ्या संकटात असतो यावर्षी मात्र पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी पिकावर भरोसा करून मोठ्या प्रमाणात पेरणी केली असून पेरणी केलेले पीक चांगले यावे याकरिता रात्रंदिवस शेतकरी जिवाचे रान करीत आहेत दुसरीकडे वन्य प्राण्यांचा हैदोस सुरू असल्याने शेतकऱ्यांना शेतातच रात्र काढावी लागत आहे शेतात फवारणी निंदन या सह अनेक कामे वेगाने सुरु आहेत आधीच शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरू असून अनेक संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे दिवसेंदिवस शेतीला लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शेती मात्र शेतकऱ्यांना पुरत नसल्याचे चित्र दिसत आहे पणज सह बोचरा या परीसरात केळी तुर सोयाबीन ज्वारी कपाशी या पिकांना शेतकऱ्यांनी पसंती दिली असून आता मात्र निसर्गाच्या भरोशावर हे पीक अवलंबून असून यावर्षी शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे त्याचबरोबर पिकावर अनेक रोगांनी आक्रमण केले असून हे पीक वाचवण्यासाठी अनेक उपाय योजना सुरु असुन शेतीचे कामे वेगात सुरु आहेत या शेतकऱ्यांनी लावलेला लाखो रुपये खर्च यावर्षी पण निघणार की नाही अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)