हिवरखेड शहरामध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या
राजगर्जनेला सुरुवात
०९ जुलै २०२३
हिवरखेड – हिवरखेड शहरामध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या राजगर्जनेला सुरुवात दि. ०२ जुलै ला महाराष्ट्र नवनिर्माण सेना (म.न.से.) चे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व मा. जिल्हासंपर्क अध्यक्ष विठ्ठल लोखंडकार साहेब आणि अकोला जिल्हा अध्यक्ष राजेश काळे यांच्या आदेशाने हिवरखेड शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहरअध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. त्या मध्ये पवन नेरकर यांची नियुक्ती म.न.से. तालुका संघटक पदी निवड करण्यात आली. व तसेच हिवरखेड शहरअध्यक्ष पदी रोहन झगडे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांची निवड म.न.से. अकोला जिल्हा उपाध्यक्ष अँड. श्रीरंग तट्टे यांच्या हस्ते करण्यात आली. त्यामध्ये म.न.से. चे कार्यकर्ते सुरज वर्मा, सुधीर हाडोळे, चेतन गायकी, प्रफुल कवळकार, शुभम खिरोडकार, श्याम ओंकारे, गौरव ओंकारे, सनी इंगळे, कुशल वानखडे, पवन भड, उमेश जयस्वाल, निखील कराळे, ओम खिरोडकार, दीपक झगडे, शुभम दळवी, सचिन शेगोकार, गौरव अस्वार व सर्व म.न.से. कार्यकर्ते उपस्थित होते.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)