परिवहन महामंडळ मंत्री यांना त्रिवार वंदन भंगार वाहनांमुळे किती प्रवाशांचे जीव घेणार

नमस्कार,
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब, उपमुख्य मंत्री साहेब,
आणि खास करून परिवहन महामंडळ मंत्री यांना त्रिवार वंदन

भंगार वाहनांमुळे किती प्रवाशांचे जीव घेणार

महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी

मंत्री महोदय साहेब मला बोलायचे नव्हते परंतु हा मुद्दा नुसता माझा स्वतःचा व जिल्ह्याचा नसून संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा मुद्दा आहे. आज अशी वेळ आली आहे की, नुकत्याच माझ्या व माझ्या मित्रा सोबत जालना ते संभाजीनगर प्रवासादरम्यान जे काही मी माझ्या डोळ्याने बघितलं ते माझ्या मते वेगळीच मला अनुभूती आली ती परिस्थिती बघून मला असे वाटत होत की आपण सध्या स्थितीत किती सुरक्षित आहो, तर चाळीस, पन्नास लोकांचे सारथ्य करणारे बस चालक हे सुद्धा
किती सुरक्षित आहे हे सिद्ध झाले आहे
मित्रहो मला वाटत होत की महाराष्ट्र शासन आपल्या सर्व जनतेकडे आणि महामंडळाचे बस चालक असो की कंडक्टर असो यांच्याकडे पुरे पूर लक्ष देत असेल परंतु आज असं काही चित्र दिसलं , कीआज मी बोलायला मजबूर झालो आहे ,एकी कड़े आपला देश खूप काही बदलत आहे , त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सतत देशाचे प्रगतीसाठी झटत आहेत तर दुसरी कड़े आपल्या महाराष्ट्र राज्यात शासनाचे अधिकारी असो की शासनकर्ते नेते असो ह्यांचे ह्या गंभीर बाबीकडे कोणतेही लक्ष नाही हे सिद्ध होत आहे,केवळ खुर्चीचेच त्यांना देणेघेणे आहे असे दिसून आले आहे
ह्याबाबत सध्या स्थितीत जिवंत उदाहरण मी आपणा समोर सादर करू इच्छितो
ते दृश्य मी तुमच्या पुढे सादर करतो ते म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातील( दिनांक 1/7/2023) रोजी मी आणि माझा मित्र छत्रपती संभाजी नगर साठी बदनापूर इथून जालना ते छत्रपती संभाजी नगर साठी महामंडळाचे बस मध्ये प्रवास करत असताना जागा नसल्या कारणांनी मी उभ्याने प्रवास करत असताना बसचे बस चालक स्वतःचे जीवाची काळजी न करता, त्यांना बसण्याची शीट ही तुटकीफुटकी ,गाडीचा कर्णकर्कश आवाज,गाडीचे गियर मध्ये येणारा आवाज, पाहता गाडी मधील 40 ते 50 लोकांची जबाबदारी घेऊन प्रवाशांना त्यांचे ठिकाना पर्यंत पोहचवण्याचे काम करतात ह्यावरून सारथ्य करणाऱ्या बस चालकांना शासन किती संरक्षण व सोय उपलब्ध करून देते हा प्रश्न निर्माण झाला आहे
बस चालक असो की कंडक्टर हे दिवस भर राब राब तात त्यांचे नशिबी असलेली भंगार बस की ती बस एकदम बे कायदेशीर झाली असून त्या बसचे कधी काय होईल हे येणारा प्रसंगच सांगून जातो त्यामध्ये त्याचे जीवनाचे सुद्धा काही खरे नसते
एकीकडे एखादा नेता आपल्या साठी सर्व सोईयुक्त असे वाहन निवडतो तर गाडीचे जास्त काम निघालं तर विकतो किव्हा ती गाडी भंगार मध्ये विकतो कारण ती जीव घेणी असते, ह्या बाबी नुसार प्रशासन, शासनातील नेते मंडळी महाराष्ट्रतील भंगार झालेल्या बस कड़े का लक्ष देत नाहीत त्या पूर्ण पणे भंगार झालेल्या गाडी च्या गिअरबॉक्स ,व इंजिन मधून बेकार असा (कार्बन डाय ऑक्साइड) वायू हा बस चालक च्या नाका तोंडा मध्ये, तर जातोच त्या बरोबर प्रवाशांना सुद्धा त्याचा सामना करावा लागतो परिणामी गंभीर अश्या आजाराला ड्रायव्हर बरोबर प्रवासी सुद्धा आमंत्रनाला बळी पडत आहेत अशी परिस्थिती महाराष्ट्र शासनाचे भंगार बस द्वारे सुरू आहे
यावर प्रशासनाचे, शासनाचे का दुर्लक्ष होत आहे ?
➡️का टॅक्स वसुली नाही होतंय ?
➡️तिकीट कमी घेताय ?
➡️मग तरी सुद्दा नविन बस का नाही ?
➡️ ह्या भंगार बस का ?
शासन वाहनांवर रोड टॅक्स रुपात वसूली करतो तर मग जनतेच्या सेवेत नविन बसेस का नाही ? एकीकडे नेत्याना ,राजकारण्यां नविन कार (चांगली बुलेट प्रुफ ) कार पाहिजे आणि ज्यांच्या जवळून वसुली करता त्यान्हा अश्या भंगार बसेस ?
आणि ज्यांचे भरवशावर सत्तेची चाबी, खुर्ची मिळते त्याच्या साठी अशी सोय आहे काय, आणि ज्या बस चालक कर्मचाऱ्यांच्या भरवशावर शासन चालवल्या जाते त्यांची सुद्दा अशी गैर सोय , आधीच पगार कमी आणि त्यात त्याचें प्रदूषनामुळे जीवन सुद्दा कमी केले जात आहे.. हे कितपत योग्य आहे
एकी कड़े देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी रात्रंदिवस डिजिटल भारत होण्यासाठी अहोरात्र झटत आहेत आणि राज्यातील नेते मंडळी आपलाच खिसा भरण्याचे काम करत आहेत ही वस्तुस्थिती आहे
आज खाजगी बसेस सर्व सोयी देऊ शकतात परंतु त्यांचे चालकांमध्ये असलेला उतावीळ पणा हा नुकत्याच घडलेल्या वाईट घटनेमुळे दिसून आला आहे एकीकडे स्वतः साठी नविन बुलेट प्रुफ कार, हेलिकॉप्टर, प्रायव्हेट विमान ( वा रे मेरे भारत वा रे माझा महाराष्ट्र माझा ! ) सध्याचे काळात अत्याधुनिक तंत्रज्ञान असून सुद्दा अशी राज्याची दुर्दशा ह्या राजकीय नेते मंडळींनी केलीआहे
ह्यासाठी मंत्री महोदय लवकरात, लवकर महामंडळाचे बस सेवा मध्ये अत्याधुनिक सुधारणा करा व जनतेला चांगली सुविधा उपलब्ध करून द्या अन्यथा जनतेचा रोष अनावर होणार हे निश्चित

धन्यवाद
तुमचाच मतदार
सुरज म. मुरकुटे
अंजनगाव सुर्जी,7387335502

https://chat.whatsapp.com/DwdHk2mmJL5GQJmaeYvQYJ

Spread the love
[democracy id="1"]