हिवरखेड चंडिका चौक झाले ,घाण कचरा चौक, गावातील मुख्य चौकाचीच अशी दशा,तर गावातील इतर नगरांची कशी असेल,

हिवरखेड चंडिका चौक झाले ,घाण कचरा चौक,

गावातील मुख्य चौकाचीच अशी दशा,तर गावातील इतर नगरांची कशी असेल,

हिवरखेड येथील मुख्य प्रसिद्ध असलेला चंडिका चौक गेल्या काहीदिवसांनपासून हा चौक घाण कचऱ्यात दिसून येत आहे, या चौकातच मोठे प्रसिद्ध मरिमाय मंदिर सुध्दा आहे,या चौकात शाळा सुद्धा आहे, तसेच विविध सामाजिक कार्यक्रम सुद्धा या चौकात केले जातात, या चौकातुनच प्रमुख पाहुण्यांनची विविध कार्यक्रमास ये जा सुद्धा असते, परंतु या चौकात खूप मोठा घाण कचरा झाल्याने व ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत असल्याने चौकातील नागरिकांनि बंड पुकारला आहे, अनेकांनी आपला याबाबत संताप व्यक्त केला, अनेकांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली शिवसेना शिंदे गटाचे संदीप बोडखे, उमेश पंचबुद्धे, पुरूषतम् रेखाते, अमोल काळे, सतिष मोटे, मुरलीधर शिंदपुरे,शुभम तिजारे, नंदकिशोर आतकरी, नंदू ठवकर, राजू बावस्कर,प्रणव बोडे, श्रीराम बावनकार,मोहन लांडगे, आदींनी या घाण कचऱ्या बाबत आपल्या भावना दुखावल्याचें व्यक्त केले आहे,याबाबत ग्रामपंचायत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन या चौक स्वच्छ परीसर करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत,

प्रतिक्रिया,

मंदिर परिसरात असा घाण कचरा नागरिकांनी न करावा या पेक्षा महत्वाचे कचरा येथे होत असेल तर ग्रामपंचायने या कचऱ्याची विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ करायला हवा,

संदीप बोडखे,
(शिवसेना शहर अध्यक्ष हिवरखेड,)

मंदिर परिसरात असा दुर्गंधीचा कचरा झाल्याने आमच्या भावना दुखावल्या जात आहे,ग्रामपंचायतने हा विषय गांभीर्याने घेऊन दखल घ्यावी,

रवी गावंडे,
(बजरंग दल)

Spread the love
[democracy id="1"]