नगरपरिषद बिले काढण्यात व्यस्थ, नागरिक मात्र घाणीच्या साम्राज्याला त्रस्त
संजय गवळी आकोट तालुका प्रतिनीधी
शहर वासीयांना नपाने सोडले वाऱ्यावर : शिवसेनेचा आरोप
अकोट घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यांवरील खड्डे नागरिकांच्या नाकी नऊ आणत आहेत. अनेक वस्त्यांमध्ये पथदिवे बंद आहेत. काही भागातील कामे अर्धवट ठेवल्या गेली आहेत. अशात मात्र नपा प्रशासन बिल काढण्यात व्यस्त असून नागरिकांच्या समस्यांसोबत सोयरसुतक नसल्याचा प्रत्येय येत आहे. असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदनातुन करण्यात आला आहे . शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर,माजी आमदार संजय गावंडे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे,महिला आघाडी जिल्हा संघटिका प्रा माया म्हैसने,शिवसेना,जिल्हा समन्वयक शाम गावंडे ब्रह्मा पांडे तालुका प्रमुख ,विधानसभा संघटक विक्रम जायले,शिवसेना शहरप्रमुख अमोल पालेकर,शिवसेना शहर संघटक सुनील रंधे यांच्या नेतृत्वात जिल्हा उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले .
अकोट शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळा सुरू असताना नाल्या तुंबल्या आहेत. नागरिकांच्या घरा समोर घाण पाण्याचे डबके साचत आहेत. त्यामुळे नपा प्रशासनाने या बाबीची दाखल घेणे गरजे आहे. रस्त्यांवर मोठं मोठे खड्डे पडलेले आहे. त्यामध्ये पावसाचे पाणी साठवून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. शहरातील मोठ्या नाल्या व नाले यांची साफ सफाई नसल्याने रोगराईचे प्रमाण वाढले आहे. अनेक लोकवस्तीत पथदिवे बंद आहेत. दुसरीकडे नप प्रशासनाकडून फवारणीची कामे होत नाहीत. या सोबतच पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील बऱ्याच ठिकाणी रस्त्याची अर्धवट कामे केल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नपा प्रशासन नागरिकांच्या जीवावर उठल्यागत झाली आहे असे विविध आरोप शिवसेनेने निवेदनात नमूद केले आहेत दुसरीकडे न पा प्रसशासन काम न करता किंवा निकृष्ट कामाचे बिल काढण्यात व्यस्त असून राजकीय व उच्चभ्रू लोकांचे काम करण्यात स्वारस्य दाखवीत असल्याचा आरोप शिवसेनेने या निवेदनात केला आहे हे सर्व प्रश्न सात दिवसात मार्गी न लागल्यास नगर पालिका प्रशासना विरोधात आक्रमक पवित्रा घेण्याचा ईशारा शिवसेनेचे तालुका अध्यक्ष ब्रम्हा पांडे यांनी निवेदनातून दिला आहे . यावेळी जि.प.सदस्य डॉ प्रशांत अढाऊ,राजू मोरे,जगन निचळ,प.स.सदस्य सुरज गणभोज ,मुरली खोटे, सुभाष सुरत्ने, रोशन पर्वतकर,राहुल पाचडे,नंदु बोन्द्रे,रमेश खिरकर ,धीरज गीते सरपंच, उमेश आवारे,दिवाकर भगत, विजय ढेपे,प्रथमेश बोरोडे,संजय रेळे,योगेश सुरत्ने,रमेश सोनोने, राजू सोनोने,अमोल बदरखे , नितीन कोल्हे ,गोपाल कावरे, सोपान साबळे,प्रशांत येउल,विलास ठाकरे,किशोर आवारे,सरपंच शुभम मैसने,मंगेश चोधरी,देवा मोरे,अजय काळे ,गणेश चंडालिया ,गोलु खालोकर ,प्रफुल्ल बोरकुटे,मुन्ना चोधरी,अमोल तायडे ,विकी जायले,संतोष ठाकरे, योगेश बरेठिया,आशिष जायले,प्रणव चोरे,योगेश वडतकर,स्वप्नील चौधरी,शुभम वडणे,अजय काळे ,रतन कोल्हे,अश्विन चौधरी,संतोष इप्पर ,सोपान पांडे ,अक्षय बोडले ,बाबाराव सोनोने,नितिन देवकर,रमेश कोरे लावा ,विकास जयस्वाल,अनिल डोबाळे , प्रभू मेंढे, अतुल मेंढे अमोल भारंभे,शाम रोहनकर ,प्रकाश गावंडे,यश पांगारकर,शुभम वडजे,रोशन ढोले,अविनाश नाथे,अमोल तायडे,भानुदास गवई,राम अढाऊ,अश्विन डोंगरे यांच्यासह अकोट तालुक्यातील व शहरातील शिवसेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.