ग्रामीण भागातील महिला शेतकरी स्वयंपूर्ण व सक्षम होण्यासाठी फार्मर प्रोडूसर कंपन्यांनी रोजगारांच्या संधी

ग्रामीण भागातील महिला शेतकरी स्वयंपूर्ण व सक्षम होण्यासाठी फार्मर प्रोडूसर कंपन्यांनी रोजगारांच्या संधी उपलब्ध करून द्याव्या प्रा.डॉ. बबनराव तायवाडे यांचे मनोगत.

कृषी क्षेत्रात महिलांना सक्षम रोजगार निर्मिती उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट= मा.प्रकाश साबळे यांचे मनोगत.

P K V ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नशील- प्रा.डॉ.वर्षा टापरे, प्रमुख प्रादेशिक संशोधन केंद्र अमरावती

1 जुलै 2023 कृषी दिनानिमित्त क्रिषामी ऍग्रो प्रोडूसर कंपनीच्या वतीने भव्य ‘किसान संगोष्ठी व महिला शेतकरी उद्योजकता शिबिराचे भव्य आयोजन.

हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक व शिक्षण महर्षी स्व. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना शेतकऱ्यांच्या वतीने अभिवादन.

प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.डॉ.बबनराव तायवाडे जी, शिवाजी कृषी महाविद्यालय चे प्राचार्य नंदकिशोर चिखले,RRC च्या प्रमुख प्रा. वर्षा टापरे, KVK दुर्गापूरचे प्रमुख मा. के.पि.सिंग, ग्रामगीताचार्य मा.सौ. पौर्णिमाताई सवाई, J farm (tafe) चे प्रमुख संजय सिंग अहिरवाल, मा.कैलास गावंडे, संचालक मा. प्रकाशदादा साबळे, मा.ज्ञानेश्वर काळे, मा.मंगेश हरणे, मा. छोटूभाऊ देशमुख, मा.नूतन काळे, मा.प्रवीण वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते. उत्कृष्ट महिला शेतकरी उदयोजक तसेच कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन व मदत करणारे युवा कृषी तज्ञांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

Spread the love
[democracy id="1"]