हिवरखेड येथे आषाढी एकादशी निमित्ताने भाविक विठ्ठल नामात मग्न,

हिवरखेड येथे आषाढी एकादशी निमित्ताने भाविक विठ्ठल नामात मग्न,

प्रतिनिधी,
हिवरखेड पाडुरंग संस्थान मध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधून भाविकांनि श्री विठ्ठल रुखमाई दर्शनाचा लाभ घेतला, या एकादशीला गुरुवार आल्याने भाविकांनि श्री गजानन महाराज मंदिरात सुद्धा गजानन महाराज दर्शनाचा लाभ घेतला, या दिवशी या दोन्ही मंदिरात दिवसभर भाविकांची रेलचेल दिसून आली, दोन्ही संस्थान कडून दर्शनाला आलेल्या भाविकांना चहा व फराळाचे वितरित करण्यात आले, संध्याकाळी श्री विठ्ठल रुखमाई संस्थानच्या वतीने गावातुन दिंडीयात्रा काढण्यात आली,यामध्ये पंचक्रोशीतील भाविक महिला पुरुषांनी सहभाग घेतला असून दिंडी मध्ये विठ्ठल नामाची भजने, गीत गायन केले, या दिंडीचे गावात ठीक ठिकाणी स्वागत करण्यात आले, श्री विठ्ठलरुखमाई संस्थानच्या व श्री गजानन महाराज संस्थानच्या सेवेकरांनी दिवसरात्र मंदिरात सेवा दिली, अनेक भाविकांनी यंदा चांगले पीक पाणी होऊ दे असे साकळे पाडुरंगाला घातले,

Spread the love
[democracy id="1"]