अंजनगाव येथील न्यू श्रीराम ॲग्रो सर्विसेस मध्ये अजित १५५ बियाणांची विक्री

अंजनगाव येथील न्यू श्रीराम ॲग्रो सर्विसेस मध्ये अजित १५५ बियाणांची विक्री

अंजनगाव सुर्जी येथील न्यू श्रीराम ॲग्रो सर्विसेस नेहमीच आपल्या शेतकरी बांधवांना योग्य त्या भावात योग्य ती खते व बियाणे उपलब्ध करून देते. त्यानुसारच याही वेळेस येथील न्यू श्रीराम ॲग्रो सर्विसेस येथे सर्व शेतकरी बांधवांच्या मागणीनुसार अजित १५५ कपाशी बियाणे अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देण्यात आले. सद्यस्थितीत हे बियाणे बाजारात कमी प्रमाणात उपलब्ध आहे व त्याची मागणी जास्त आहे. त्यामुळे बाजारातील या बियाणांचे भाव हे एमआरपी पेक्षाही जास्त असल्याचे आढळून आले आहे. अशा परिस्थितीत न्यू श्रीराम ॲग्रो सर्विसेस अंजनगाव सुर्जी यांनी अजित १५५ कपाशी बियाणे अतिशय माफक दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व शेतकरी वर्गात समाधान दिसून येत आहे. सदर विक्री ही येथील तालुका कृषी अधिकारी श्री राजकुमार अडगोकार साहेब व पंचायत समिती कृषी अधिकारी श्री अश्विन राठोड साहेब यांच्या देखरेखी खाली करण्यात आली.

Spread the love
[democracy id="1"]