अकोला पंढरपूर विशेष यात्री ट्रेन सुरु केल्याने वारकऱ्यांनी रेल्वे मंत्री व मोदी सरकारचे मानले आभार

अकोला पंढरपूर विशेष यात्री ट्रेन सुरु केल्याने वारकऱ्यांनी रेल्वे मंत्री व मोदी सरकारचे मानले आभार
डॉ ओळंबे
बाळासाहेब नेरकर कडून

अकोला _महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या श्री शेत्र पंढरपूर येथील विठुरायाच्या व रुक्मिणीच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक भक्त श्रद्धापूर्वक दर्शनासाठी जात असतात. काही वारकरी पायदळ वारीतून जातात,काही एसटी बसेस व खाजगी वाहनातून दर्शनासाठी परंतु गरीब भावी भक्तांना बसेस व खाजगी वाहन परवडत नसल्यामुळे ते दर्शनापासून वंचित राहतात याची दखल घेऊन केंद्रीय रेल मंत्री श्री वैष्णवी केंद्रीय राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे पाटील तसेच केंद्रातील मोदी सरकारने यात्रेकरूंसाठी स्पेशल यात्री ट्रेन सुरू करून भाविकांना दर्शनाची संधी उपलब्ध करून दिल्याने वारकऱ्यांमध्ये प्रचंड आनंद असून वारकरी मोदी सरकारला धन्यवाद देत असल्याचे डॉ अशोक ओळंबे यांनी सांगितले याप्रसंगी भाजपाच्या वतीने भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे यांनी केंद्रातील मोदी सरकारचे आभार मानून रेल्वेने जाणाऱ्या यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या तसेच लोको पायलट व रेल्वे गार्ड यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी रेल्वे समितीचे सदस्य भाजपा विधी आघाडी प्रमुख अड सुभाषसिंह ठाकूर, भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे,भाजपा सदस्य संजय चौधरी माजी नगरसेवक गोपी ठाकरे भाजपा सरचिटणीस अक्षय गंगाखेडकर धनंजय गिरधर यांनी विशेष यात्री गाडीला हिरवी झेंडी दाखवून वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला श्रीकांत एखंडे विजय मोटे विजय काकड रवींद्र जैन सचिन बोरेकर राजेश मिश्रा प्रभाकर वानखडे गजानन गोलाईत, दीपक गवारे भाऊराव साबळे सोनू उज्जैनकर शेखर शेळके सुरेश अंधारे राजेश घाटोळे किशोर वडतकर राजकुमार गायकवाड यांचेसह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
[democracy id="1"]