संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबाराय पालखी सोहळ्यात पांडूरंग नवले परिवाराकडून अन्नदान
संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबाराय पालखी सोहळा वेळापूर या ठिकाणी मुक्कामी असतो.
प्रतिनीधी ; सांगोला
क्षुधेलिया अन्न ! दयावे पात्र न विचारुन !! धर्म आहे वर्मा अंगी ! कळले पाहीजे प्रसंगी !! द्रव्य आणि कन्या ! येथे कुळ कर्म शोधण्या!! तुका म्हणे पुण्य गांठी । तरीच ऊचिताची भेटी !! सदरील अभंगात तुकोबारायांनी अन्नदानाचे महत्व सांगीतले आहे.दान धर्मापेक्षा भुकेलेल्याला केलेले अन्नदान हे कधीही चांगलेच असल्याचे सांगीतले आहे. तुकोबाराय म्हणतात भुकेल्या व्यक्तीला अन्नदान करावे. गरजू असलेल्या व्यक्तीचे पोट भरावे. हे अन्नदान करतांना तो कोण आहे विचारू नये, पाहू नये. यातच खरा धर्म आहे.भुकेल्याला अन्नदान म्हणजेच खऱ्या धर्माचे वर्म होय. हे वेळप्रसंगी माणसाला कळले पाहीजे. म्हणजेच तुकोबाराय भुकेल्या व्यक्तीला पोटभर जेऊ घालणे हाच धर्म असल्याचे सांगतात.आषाढी एकादशी निमित्त पंढरीच्या दिशेने जाणाऱ्या वैष्णवांच्या मेळ्यात सहभागी होणे, त्यांच्या सेवेची संधी मिळणे हा मोठे भाग्य असते. गेली 29 वर्षा पासुन अन्नदान करत आहेत.या निमित्ताने सांगोला येथील पांडूरंग विष्णू नवले परिवार वतीने वारकऱ्यांची मनःपूर्वक सेवा होत आहे..*पाचशे वारकऱ्यांना अन्नदान करून खऱ्या अर्थाने सामाजिक कर्तव्य पार पाडण्याचे काम या माध्यमातून होत असते.* वेळापूर येथील अन्नदान करण्यात आले.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)