तेल्हाऱ्यात आढळला बनावट खत कारखाना कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई

तेल्हाऱ्यात आढळला बनावट खत कारखाना कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई

संजय गवळी आकोट तालुका प्रतिनीधी

तेल्हारा : येथील एमआयडीसीतील बनावट खत कारखान्यावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकत आठ लाख पाच हजार ९५० रुपयांचा खताचा साठा जप्त केला. पंचायत समिती व कृषी विभागाने ही संयुक्त कारवाई केली असून, तेल्हारा पोलिस स्टेशनला या संदर्भात कृषी विभागाकडून तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी कारखान्याच्या संचालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार ता. २४ जून रोजी रात्री एमआयडीसी परिसरात संशयास्पद कृषी निविष्ठा निर्मिती होत असल्याची माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. त्या अनुशंगाने तालुकास्तरीय भरारी पथकद्वारे एमआयडीसी परिसरात तपासणी करण्यात आली. राहुल सरोदे नामक व्यक्तीच्या युनिटमध्ये खत निर्मिती सुरू होती. त्यांना याबाबत दस्तऐवजाची मागणी केली असता त्यांनी माहिती सादर केली नाही. त्यानंतर पंच व पोलिसांसमक्ष पंचनामा करून पुढील कार्यवाही करण्यात आली.या खत उत्पादक युनिटचा कुठलाही वैध परवाना नसतांनाही उत्पादन सुरू होते. नामदेव ऑग्रो अशा नावाने येथे खत निर्मिती केली जात होती. घटनास्थळी अंदाजे आठ लाख पाच हजार ९५० रुपये किमतीचा माल आढळला. सरोदे यांना विचारपूस केली असता आम्ही तीन महिन्यापूर्वी युनिट सुरू केले होते, असे सांगितले. सोबतच त्यांनी अंतिम उत्पादन कुणालाही विक्री केली नसल्याचे विरोधाभासी उत्तर दिले.त्यानंतर ते कुणालाही न सांगता

घटनास्थळावरून निघून गेले. ही बाब संशयास्पद असल्याने व कोणताही उत्पादक परवाना नसताना देखील येथे खत निर्मिती होत असल्याने खताचे नमुने पांचासमक्ष घेऊन पुढील कार्यवाही साठी पाठवण्यात आले. येथे निर्मिती कृषी निविष्ठांबाबत विक्रिबंद आदेश देण्यात आला. त्यानंतर कृषी विभागाच्या भरारी पथकाने तेल्हारा पोलिस स्टेशनमध्ये बनावट खत निर्मिती कारखान्याच्या संचालकांविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली. पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. ही कारवाईत तालुका स्तरीय भरारी पथकाचे तेल्हारा तालुका कृषी अधिकारी नरेंद्र राठोड, पंचायत समितीचे कृषी अधिकारी भरतसिंग चव्हाण, तेल्हारा मंडळ कृषी अधिकारी गौरव राऊत यांनी केली.मैदा आट्याच्या बॅगमध्ये भरले जात होते खत

कृषी विभागाच्या भरारी पथकाने तेल्हारा एमआयडीसी परिसरातील खत कारखान्यावर धाड टाकली तेव्हा ग्रॅन्यूलर फॉर्ममध्ये एसएसपी व डीएपी खत मोकळ्या अवस्थेत आढळून आले. तेथेच ग्रॅन्युलर फॉर्मच्या ५६७ बॅगा आढळल्यात. त्या बॅगांवर मैदा, आटा, युपीएल असे नमुद केले होते. याशिवाय एन पॉवर ग्रॅन्युलर नाव असलेल्या नामदेव ॲग्रो उत्पादीत ह्युमिक अॅसिड ०६ टक्के, अमिनो अॅसिड ०४ टक्के, सिव्हि एक्सट्राक्ट ०३ टक्के, फलविक ॲसिड 03 , टक्के, ॲडज्युवंट क्यू एस टोटल १०० टक्के असे कन्टेट असलेल्या बॅच नं. ००१, वजन ५० केजीस उत्पादीत जून २०२३, एमआरपी १३५० असलेल्या ३० बॅगा मोकळ्या अवस्थेतआढळल्या ग्रॅन्युलर फॉर्म हे काळ्या, राखाडी व ब्राऊन असे तीन रंगाचे मेटरियल आढळले.शासन व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल

तेल्हारा पंचायत समितीचे कृषी अधिकारी भारत चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून बनावट खत निर्मिती प्रकरणात कारखान्याचे संचालक राहुल नामदेव सरोदे यांच्या विरुद्ध शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी भादंवि कलम ४२०, रासायनिक खते (नियंत्रण) आदेश १९८५ कलम सात, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ कलम तीन (दोन) (ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई कृषी विभाग तेल्हारा चे तालुका कृषी अधिकारी नरेंद्र राठोड, तेल्हारा पंचायत समितीचे कृषी अधिकारी भरत चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी गौरव राऊत, तेल्हारा पोलिस स्टेशन चे राजुभाऊ इंगळे ,अजय पोटे, यांनी केली.यावेळी कृषी सहायक प्रदिप तिवाले,रोशन बांबळे, नंदकिशोर अघडते,कृषी मित्र विलास बेलाडकर शेतकरी ज्ञानदेव घंगाळ रतन राऊत व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love
[democracy id="1"]