कत्तलीसाठी जाणाऱ्या चार गोवंशांना जीवनदान आरोपी पोलिसांना चकमा देऊन फरार

कत्तलीसाठी जाणाऱ्या चार गोवंशांना जीवनदान

आरोपी पोलिसांना चकमा देऊन फरार

बाळासाहेब नेरकर कडून

हिवरखेड पोलिसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या चार गोवंशांना जीवनदान दिल्याची घटना 22 जून च्या मध्यरात्री घडली. तर यातील आरोपी मात्र पोलिसांना चकमा देण्यात यशस्वी झाला आहे. या संदर्भात अधिक वृत्त असे की, 22 जून च्या मध्यरात्री फिर्यादी नेव्हारे व त्यांचे सहकारी जीप ने हिवरखेड टाऊन परीसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हिवरखेड नजीक असलेल्या बगाडा नाल्याचे पुलाखाली नाकाबंदी करून यातील अज्ञात आरोपी कडून 1 बैल व 3 गोऱ्हे असा अंदाजे एकूण पस्तीस हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या जनावरांना वाहनांमध्ये कोंबून, कत्तली करीता उपाशी पोटी मारहाण व जख्मी करुन घेऊन जात असल्याचे फिर्यादी महादेव रामजी नेव्हारे यांनी सांगितले. यावरून अज्ञात आरोपी विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून हिवरखेड पोलिसांनी कलम 5, 5 क 9, 9अ प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार विजय चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टाॅफ आरोपीचा शोध घेत आहे.

Spread the love
[democracy id="1"]