अंजनगाव सुर्जी नगरीत आरोग्य उपचार शिबीर संपन्न

अंजनगाव सुर्जी नगरीत आरोग्य उपचार शिबीर संपन्न

शेकडो नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ

महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका विशेष प्रतिनिधी:

पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्याची सामाजिक बांधिलकी व गेली नऊ वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोगा म्हणून केंद्र सरकारच्या योजना ह्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत गेल्या पाहिजे ह्या करिता भारतीय जनता पार्टी व माजी आमदार स्व.किसनराव खंडारे बहुउद्देशिय संस्था दर्यापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य उपचार शिबिर अंजनगाव सुर्जी येथे संत रूपलाल महाराज कॉम्प्लेक्स पान अटाई येथे संपन्न झाले. यावेळी विधानसभा प्रमुख गोपाल चंदन यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली सदरचे शिबिराला विशेष योगदान दिलेल्या डॉ.मिलिंद पाठक,डॉ.आशिष डगवार,डॉ.महेंद्र सांगोळे,डॉ.सुनील साकरकर, या सुप्रसिध्द तज्ञांचे व चमूचे त्यांनी आभार व्यक्त केले. आरोग्य शिबिरामध्ये पोटाचे विकार, मूळव्याध, चर्मरोग, डोळ्यांचे आजार, व त्यावरील उपचार इ सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या त यावेळी भव्य आरोग्य उपचार शिबिरादरम्यान एकूण ११५ रुग्णांनी लाभ घेतला असून सर्वांनी शिबिराबाबत समाधान व्यक्त केले ह्याप्रसंगी शिबिराला जिल्हा उपा. डॉ.विलास कविटकर,जिल्हा सचिव ऍड.पद्माकर सांगोळे, माजी ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष मनोहर मुरकुटे,भाजयुमो जिल्हाध्यक्ष मनिष मेन, महीला जिल्हाध्यक्ष प्रियंकाताई मालठाणे,माजी आरोग्य सभापती सुनीताताई मुरकुटे (न.प.अंजनगाव सुर्जी), विमल ताई माकोडे माजी नगरसेविका,माजी उपाध्यक्ष सविताताई बोबडे (न.प.अंजनगाव सुर्जी),माजी सदस्य शिलाताई सगने (न.प.अंजनगाव सुर्जी) गजानन कालमेघ,,संगीता ताई मेन,निताताई मोगरे,संजय नाठे,अविनाश पवार,गजानन काळमेघ,हर्षल पायघन,रितेश आवंडकर,गौरव चांदुरकर,सतीश मट्टे आदी भाजपा व भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ता यावेळी उपस्थित होते.

Spread the love
[democracy id="1"]