तेल्हारा येथे कृषी निविष्ठा विक्री केंद्राची तपासणी मोहीम
हिवरखेड बाळाहेब नेरकर कडुन
खरीप हंगाम येऊन ठेपला आहे.शेतकऱ्यांची बी बियाणे खरेदीची लगबग सुरू झालेली आहे.हंगाम मध्ये निविष्ठा बाबत कुठलीही तक्रार व अडचणी होऊ नये या दृष्टीने कृषी विभागामार्फत कृषि निविष्ठा केंद्र तपासणी मोहीम स्वरूपात सुरू आहे.कृषी केंद्रामध्ये बियाण्याच्या प्राप्त साठा विक्री व विक्रीनंतर सध्या उपलब्ध असलेल्या साठा, साठा रजिस्टर याबाबत तपासणी करण्यात येत आहे. आठवड्याच्या अखेरीस जोरदार मान्सून चे आगमन होऊन पावसात सुरुवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला असल्यामुळे विविध कृषी निविष्ठा विक्रेता दुकानावर शेतकऱ्याची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.यामध्ये काही विशिष्ट वाणांची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.त्याच अनुषंगाने शेतकऱ्याला उत्तम प्रतीचे प्रमाणित बियाणे व खते योग्य दरात मिळावे व शेतकऱ्याची कुठल्याही प्रकारे फसवणूक होऊ नये याकरता कृषी विभागाने ही मोहीम हाती घेतलेली आहे.यामध्ये तालुका कृषि अधिकारी श्री नरेंद्र राठोड , कृषि अधिकारी पंचायत समिती श्री भरतसिंग चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी गौरव राऊत ,यांनी तपासणी केली असून याबाबत काही तक्रार असल्यास कृषि विभागास संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.