श्री संत वासुदेव महाराज पालखीचे भगवान बार्शी मध्ये जंगी स्वागत

श्री संत वासुदेव महाराज पालखीचे भगवान बार्शी मध्ये जंगी स्वागत
…(थेट बार्शी येथून पालखीतून )

बाळासाहेब नेरकर कडुन

चला पंढरीसी जाऊ, रखुमादेवी वरू पाहु, डोळे निवतील कान, मना तेथे समाधान, या संतांच्या शिकवणीनुसार संपूर्ण देशातील सर्व वारकरी संतांची पंढरी वारीकरिता श्रद्धासागर अकोट येथून निघून आज दुपारी कुसळब येथे महाराज चे भक्त किसन ननवरे यांच्या घरी दुपारचे जेवण प्रवचन पालखीचे स्वागत आटपून पालखी भगवान बार्शी येथे आगमन झाले असून या ठिकाणी भक्तगणांनी या पालखीचे भव्य दिव्य असे स्वागत केले. या पालखीचे भगवान बार्शी मंदिराच्या वतीने व भक्तगणांच्या वतीने विविध ठिकाणी श्रीसंत वासुदेव महाराज यांच्या पालखीचे स्वागता करून फराळ ,चहापाणी, राहण्याची व जेवणाची व्यवस्था चौखं करण्यात आली. त्यानंतर मंदिरात कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.
सद्गुरु श्रीसंत वासुदेव महाराज यांनी आजीवन पंढरीची वारी अखंड केली. श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, आकोट द्वारा श्री संत वासुदेव महाराज यांचा पायदळ पालखी सोहळा अव्याहतपणे श्रीक्षेत्र पंढरपूर वारीर्थ निघत असतो. हे पालखी सोहळ्याचे १४ वे वर्ष आहे. बार्शीहून प्रस्थानाचे दिवशी पहाटे श्रींचा विधिवत अभिषेक आरती पूजन व भक्तांनी पालखीचे मोठ्या प्रमाणात दर्शन घेतले.यां ठिकाणी प्रस्थानपर कीर्तन संपन्न झाले.. तद्नंतर वारकऱ्यांच्या गजरामध्ये श्रींची महाआरती होऊन रथयात्रेने भावपूर्ण वातावरणात श्रींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी पुढे झाले. पालखी सोहळ्यामध्ये पताकधारी, अब्दागिरी, टाळकरी, वारकरी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, विणेकरी यांसह शेकडो महिला-पुरुष सहभागी झाले आहेत. याप्रसंगी संस्था अध्यक्ष सर्वश्री ह भ प वासुदेवराव महल्ले पाटील, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजूरकर, सचिव रवींद्र वानखडे, सहसचिव अवि गावंडे,मोहनराव जायले पाटील, विश्वस्त महादेवराव ठाकरे, अशोकराव पाचडे, जयदीप सोनखासकर, नंदकिशोर हिंगणकर, सदाशिवराव पोटे, दिलीपराव हरणे, अनिल कोरपे, गजाननराव दूधाट, केशवप्रसाद राठी, आदी विश्वस्त मंडळी व पालखी सोहळा व्यवस्थापक श्री अंबादास महाराज मानकर यांचेसह बरीच महाराज मंडळी उपस्थित आहे. पालखी सोहळा यशस्वी करण्याकरता परिश्रम घेत आहेत.
बार्शीच्या नगर शहराच्या प्रमुख मार्गाने श्रींच्या पालखी सोहळ्याचे पूजन व स्वागत संपन्न झाले.

श्री क्षेत्र पंढरपूर पायदळ वारी २६ दिवसांमध्ये 650 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून येथील श्री संत वासुदेव महाराज धर्मशाळेमध्ये पंढरपूर श्रींच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सुनियोजित आहे. तसेच आषाढ शुद्ध दशमी २८ जूनला श्री संत वासुदेव महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम संपन्न होईल. तरी वरील पालखी सोहळा मध्ये श्री संत वासुदेव महाराज भक्तगणांनी वरील नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी आपली उपस्थिती लावून पालखी सोहळ्याचे दर्शन व कीर्तन महाप्रसादासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था व संत वासुदेव महाराज भक्तांनी केले आहे. असे एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे थेट वारीतून वारकरी समाजसेवक गजानन हरणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Spread the love
[democracy id="1"]