वर्षा कृषि केद्र उकळी बाजार येथे हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचे जाहीर मार्गर्शन
हिवरखेड प्रतिनिधी
प्रसिद्ध हवामान विश्लेषक पंजाबराव डख याचे येत्या २२ तारखेला उकळी बाजार येथील वर्षा कृषि केद्र येथे जाहीर मार्गदर्शन संध्याकाळी ५ वाजता आयोजीत करण्यात आले आहे वर्षा कृषि केद्र उकळी बाजार चे मालक सदाशिव आनंदराव माळी यांनी आयोजन केले आहे पंजाबराव डख हे अलीकडच्या काही वर्षात हवामान अचुक अंदाज व्यक्त करणारे व्यक्ती म्हणुन नावासरुपास आले आहेत महाराष्ट्रातील बहुतांश शेतकर्यांमध्ये ते लोकप्रिय ठरलेले आहेत . मोसमी पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरी आभाळाकडे डोळे करुन बसला असतांना तेल्हारा व संग्रामपुर तालुक्यती शेतकर्यांना मार्गदर्शन उपयुक्त ठरनार आहे शेतकरी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्राचा लाभ घ्यावा असे आव्हाहन आयोजकांनी केले आहे