प्रख्यात हवामान तज्ञ पंजाब डख यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन
कर्मयोगी संत गाडगेबाबा जलसिंचन पाणी उपसा सह. संस्था द्वारा आयोजित
महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी:
अंजनगाव सुर्जी मधील द्वारका चौक येथे कर्मयोगी संत गाडगे बाबा जलसिंचन पाणी उपसा सह.संस्था लखाड द्वारा आयोजित हवामान तज्ञ पंजाब डक यांचे शेती विषयक मार्गदर्शन १५ जून गुरुवार रोजी सायंकाळी 7 वाजता संपन्न झाले. परभणीचे सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाब डक यांनी यावेळी शेतकऱ्यांना हवामान,पाऊस आणि शेतात कोणते वाण पेरावे याविषयी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी डॉ.विलास कविटकर तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार अभिजीत जगताप,गटविकास अधिकारी विनोद खेडकर,तालुका कृषी अधिकारी राजकुमार अडगोकार तसेच प्रमुख उपस्थितीत प्रसाद संगई,हरिदास ताठे,अँड.हरिभाऊ देशपांडे,नियाजुद्दीन मो.साद्दिक हे होते.
यावेळी प्रगतशील कास्तकार म्हणून जगदीश सारडा व उत्कृष्ट महिला शेतकरी संगीता दुधे यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाला अंजनगाव सुर्जी शहर, तालुका , ग्रामीण शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१५ ते २० मे दरम्यानचा पाऊस निर्णायक असतो.यावर्षी २२ जून पासून पावसाचे आगमन होणार असून २८,२९,३० जून रोजी पावसाची दाट शक्यता आहे तर पूर्वेकडून पाऊस आला तर सगळीकडे पावसाचे वातावरण निर्माण होते.१० ते १५ जुलै दरम्यान पासून नियमीत येणार असून सर्वांनी झाडे लावून पृथ्वीवरील तापमान कमी करावे.
– पंजाब डक हवामान तज्ञ
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)