आकोट येथे गौरक्षण मध्ये गाईला चारा देऊन केला वाढदिवस साजरा
संजय गवळी अकोट तालुका प्रतिनिधी
स्थानिक अकोट येथील दर्यापूर रोड स्थित असलेल्या गौरक्षण मध्ये रावण साम्राज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शेखर बेंडवाल व त्यांच्या मित्र परिवाराने वाढदिवसाचा अवाढव्य खर्च न करता गौरक्षण मध्ये गाईला हिरवा चारा देऊन वाढदिवस साजरा केला. वाढदिवस म्हटला की खर्च आणि नको त्या गोष्टी हे आपण नेहमी पाहतो. पण या गोष्टीला फाटा देत अकोट येथील रावण साम्राज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शेखर बेंडवाल यांनी अवाढव्य खर्च न करता त्यांनी आपला वाढदिवस दर्यापूर रोड स्थित असलेल्या गौरक्षण संस्थांमध्ये जाऊन गौमाता यांना हिरवा चारा देऊन व त्यांची सेवा करून वाढदिवस साजरा केला. हिंदू समाजामध्ये गाईला देव मानतात. गायीची सेवा केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होते. तसेच गायीच्या अंगी 33 कोटी देव आहेत. या देवाची सेवा करणे खूप भाग्य असते. ही सेवा करण्याची संधी मिळावी या हेतूने आपल्या वाढदिवसाला अवाढव्य खर्च न करता एक नित्यप्रकारे सेवा व्हावी म्हणून गौरक्षण येथे जाऊन गाईला हिरवा चारा देऊन आपला वाढदिवस आनंदात साजरा केला. यावेळी अमित बेडवाल, अक्षय पाटील, गणेश अवारे, करण मुरकर, सौरभ जायले असंख्य युवा परिवार उपस्थित होता.