प्रा.रामदास भोजने राजीव गांधी कृषि रत्न पुरस्काराने सन्मानीत.
तरुण शेतकऱ्यांनी शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान जोपासावे -प्रा. शंकरराव गावंडे
शेती उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी शेण खत, सेंद्रिय शेती वर भर देणे काळाची गरज -प्रा.डॉ. दिलीप काळे
राजीव गांधी कृषि रत्न पुरस्कार हा शेतात राब राब राबवणाऱ्या कष्टकऱ्यांचा सन्मान आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप आहे -प्रकाश साबळे
दि.१२/०६/२०२३ रोजी बोदड येथे राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार संत्रा उत्पादक शेतकरी व मार्गदर्शक प्रा. रामदास भोजने यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान.याप्रसंगी सदर सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष प्रा.शंकरराव गावंडे, तसेच प्रमुख अतिथी डॉ. दिलीप काळे, मा.अनिल ठाकरे, मा. राजेंद्रजी येऊल सभापती ए पी एम सी, मा.प्रा.एकनाथराव तट्टे सर, राजेश सोलव, मा.ज्येष्ठ पत्रकार खुजे, मा.कैलासराव चौधरी, मा.दत्तात्रय कीतूकले, अनुल्ला खान, अक्षय साबळे, मा. सतीश ठाकरे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.या प्रसंगी मा.श्री एकनाथराव तट्टे सर तसेच सत्कारमूर्ती मा.श्री रामदास भोजने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वी साठी विपुल चौधरी, राहुल सोलव, बबनराव भडांगे, दिलीपराव गवई, मुरलीधरराव सोलव, रामेश्वरराव सोलव, मोहनराव चौधरी, प्रवीण गुळडे, गोवर्धन चौधरी, राजेंद्र कवीटकर आदी मंडळीनी सहकार्य केले.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)