कापूस पिकावरील सर्व प्रकारची कीड नियंत्रणात

कापूस पिकावरील सर्व प्रकारची कीड नियंत्रणात आणण्यासाठी दशपर्णी अर्क परिणामकारक संजय तल्हार ( अमरावती )

दर्यापूर तालुका विशेष प्रतिनिधी गौरव टोळे

येथून जवळपास असलेल्या शिवणगाव येथे कॉटन कनेक्ट बीसीआय व विकास गंगा समाजसेवी संस्था घाटंजी . यांच्या संयुक्त विद्यमाने तिवसा व धामणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना कॉटन कनेक्ट चे कार्यक्रम व्यवस्थापक सुरज रासकर विकास गंंगा संस्थेचे अध्यक्ष रंजीत बोबडे अमित गाठबैल व तसेच जिल्हा समन्वयक रवींद्र समर्थ व पियू मॅनेजर कु.वैष्णवी तालन यांच्या मार्गदर्शनाखाली कापूस पिकावरील सर्व प्रकारची कीड नियंत्रणात आणण्यासाठी दशपर्णी अर्क हा अत्यंत उपयोगी वनस्पती कीटकनाशक आहे .या किडीमध्ये रसशोषण किडी मावा तुडतुडे आणि विविध प्रकारच्या किडी व बुरशी यांचा समावेश आहे .या दशपर्णी मध्ये कडुलिंब असतो जो अंड निक्षेपणाचा प्रतिरोध करतो. तसेच गाईचे शेण व गोमूत्र असते जैविक खताच्या रूपात जमिनीमध्ये सूक्ष्मजीवि क्रीयेला प्रोत्साहन देते .हा अर्क सहजपणे बनवता येतो.शेतकऱ्यांना दशपर्णी अर्क बनविण्याचे प्रत्यक्ष क्षेत्र प्रवर्तक संजय तल्हार व निलेश पाठबाजे प्रविण रामटेके यांनी येथील बी.सी.आय .शेतकऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले .यावेळी संदीप कांडलकर अंबादास काळबांडे अमोल काळपांडे खरबडे राम जुमडे इत्यादी शेतकरी उपस्थित होते .व त्यांना दशपर्णी अर्काचे महत्व प्रात्यक्षिकाद्वारे समजून सांगण्यात आले.

Spread the love
[democracy id="1"]