शहानुर नदीत पात्रात आढळला जैविक वैद्यकीय कचरा

शहानुर नदीत पात्रात आढळला जैविक वैद्यकीय कचरा

महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका विशेष प्रतिनिधी:

 

अंजनगाव सुर्जी ग्रामीण व शहरातून वाहणारी शहानुर नदी ही मृत अवस्थेत झाल्याचे आढळून आले असून जैविक वैद्यकीय कचरा शहानुर नदीपात्रात टाकले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.यामुळे संबंधित तहसीलदार आणि मुख्याधिकारी यावर गांभीर्याने लक्ष देणार का? यावर योग्य कारवाई करणार का? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
सविस्तर माहिती अशी की,रुग्णांना दिल्या जाणारी इंजेक्शन बॉटल, सुई व इतर रुग्णालयीन घातक टाकाऊ वस्तु शहानुर नदीपात्रात राखेच्या ढिगार्‍यात सापडल्याने अंजनगाव सुर्जी शहरात याविषयीची नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे.डॉक्टरांच्या या अनागोंदी कारभारामुळे रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर येत असून यामुळे रुग्णांचा जीव वाचवणारा देवदूतच जीवितास धोका निर्माण करणार का? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
जैविक वैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्ट) शहानुर नदीपात्रात निदर्शनास आल्याने पर्यावरणाला तर धोका निर्माण झालाच आहे.परंतु मानव व पशु यांचे जीवावर गंभीर परिणाम होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमावली प्रमाणे तसेच वेळोवेळी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे प्रत्येक आस्थापनांना फक्त परवाना असणे पुरेसे नाही तिथे कायद्याचे पालन होते की नाही याची वेळोवेळी आरोग्य विभागाने तपासणी केली पाहिजे.जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट करण्याकरिता ज्या विभागाला काम दिलेली आहे त्यासंबंधित सरकारी व खाजगी डॉक्टरांनी रीतसर जैव वैद्यकीय कचऱ्याची गाडी बोलावून जैविक वैद्यकीय कचरा व्यवस्थापन करायला पाहिजे.परंतु अंजनगाव सुर्जी येथील शहानुर नदी पात्रात जैविक वैद्यकीय कचरा टाकल्याने जैविक वैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीचे नियम चव्हाट्यावर आल्याचे चित्र दिसत आहे तसेच शहानूर नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक बॉटल,प्लास्टिक पॉलिथिन ही दिसुन आले त्यामुळे शहानूर नदीची दैना अत्यंत वाईट असून मात्र शासकीय यंत्रणा कुठलीही कार्यवाही करतांना दिसत नाही.तसेच आता पावसाळाही सुरू होत असुन पावसाळा सुरू झाल्यावर शहानुर धरणातील पाणी वेळोवेळी सोडले जाते आणि या पाण्या बरोबर जैविक वैद्यकीय कचरा सुद्धा वाहून जाणार त्यामुळे नदीमध्ये फार मोठ्या प्रमाणात या कचऱ्याचे प्रदूषण होणार असल्याची चर्चा नागरिक करत आहेत.

Spread the love
[democracy id="1"]