*अंजनगाव सुर्जी येथे औरंगाबादच्या नामकरनाणासंबंधी नागरिकांमध्ये संभ्रम*

अंजनगाव सुर्जी येथे औरंगाबादच्या नामकरनाणासंबंधी नागरिकांमध्ये संभ्रम

महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका विशेष प्रतिनिधी

औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव नामकरण करण्यात आल्यानंतर सुद्धा अंजनगाव सुर्जी बस स्थानक येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील सूचीमध्ये औरंगाबादचं नाव असल्याचे तालुक्या मध्ये चर्चा असल्याचे दिसुन आले असताना ही अजुन पर्यंत अंजनगाव सुर्जी आगारा मधील औरंगाबाद चे नाव बदलुन छत्रपती संभाजीनगर असे बदलविण्यात आले नाही एस.टी. महामंडळ शासन प्रती किती जवाबदार आहे? डेपो व्यवस्थापकावर नियम उल्लंघनाची कार्यवाही होणार का? अशी चर्चा प्रवाशांमध्ये सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या परिपत्रकानुसार मध्यवर्ती बसस्थानक औरंगाबादचे नाव “मध्यवर्ती बसस्थानक छत्रपती संभाजीनगर” असे देण्याचा व मध्यवर्ती बसस्थानक उस्मानाबादचे नाव “मध्यवर्ती बसस्थानक धाराशिव” असे देण्याचा निर्णय रा.प.महामंडळाने घेतला आहे.तसेच या परिपत्रकाद्वारे नावाप्रमाणे जेथे-जेथे औरंगाबाद असे नाव असेल तेथे-तेथे छत्रपती संभाजीनगर हे नाव देण्यात यावे.याप्रमाणेच जेथे-जेथे उस्मानाबाद हे नाव असेल तेथे-तेथे धाराशिव हे नाव २४ तासांत बदलविण्याचा निर्णय व अनुपालन अहवाल तातडीने जनसंपर्क शाखेस देण्यात यावा असे दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ राप/जसं/१११ च्या परिपत्रकानुसार रा.प.महामंडळ मुंबई यांनी आदेश जारी केले होते.परंतु अद्याप पर्यंत अंजनगाव सुर्जी बस स्थानक येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील बदलविण्यात आले नाही त्यामुळे येथील नागरिक तसेच प्रवाशांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव ही नावे लावण्याचे तसे प्रावधान सुद्या आहे. केंद्रातील मोदी सरकारने २४ फेब्रुवारी रोजी राज्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावं बदलण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली असून या दोन्ही शहरांची नावं बदलली जावीत अशी अनेक वर्षांपासून शिवसेना ठाकरे गट पक्षांची मागणी होती.अखेर औरंगाबादचं नाव हे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नाव हे धाराशिव असे नामकरण करण्यात आले आहे.ज्याबाबतचा शासन आदेश जारी आहे.

माझी काही दिवसांअगोदरच अकोट येथून दर्यापूर बस डेपोला बदली झाली आहे.मी तात्काळ दर्यापूर डेपो अंतर्गत येणाऱ्या अंजनगाव सुर्जी बस स्थानक येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ सूचीवरील औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर टाकण्यास सांगतो.
– बाहुलकर डेपो व्यवस्थापक दर्यापूर.

Spread the love
[democracy id="1"]