बेकिंग न्युज अंजनगाव सुर्जी तालुक्यातील भंडारज गावात बारा तासात दोन आत्महत्या

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील भंडारज गावात बारा तासात दोन आत्महत्या

महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका विशेष प्रतिनिधी

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील भंडाराज गावात बारा तासात दोन आत्महत्या झाल्याने तालुक्यात व गावात खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणात शोक व्यक्त केला जात आहे.
सविस्तर माहिती अशी की, दि.9 जुन रोजी दुपारी 1वाजताच्या दरम्यान मृतक राधा विजय बोटोय वय वर्ष 17 राहणार भंडारज ह्या मुलीने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केली याची माहिती सुरज नंदकिशोर बोटोय यांनी पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करून मृतदेहाला शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुर्जी येथे दाखल करण्यात आले असता दि.10 जुन रोजी च्या रात्री 1 ते 2 वाजताच्या दरम्यान भंडारज गावातीलच मृतक गोपाल रामकृष्ण शिंगणे वय वर्ष 40 या इसमाने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांना अनंत रामकृष्ण शिंदे यांनी दिली असता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला मृतकाला शव विच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले असुन मृतक गोपाल रामकृष्ण शिंगणे यांनी आर्थिक विवेचनेतून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे मृतकाच्या पश्चात पत्नी एक मुलगा व एक मुलगी असल्याचे समजते परंतु मृतक राधा विजय बोटोय हिच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप ही समजले नसल्याचे पोलिसांनी सांगीतले आहे.परंतु या आत्महत्येच्या घटनेने गावासहित तालुक्यातील परिसरात खळबळ उडाली असून शोक व्यक्त केला जात आहे आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुलभा राऊत, बजरंग इंगले ना.पो.कॉ.संजय इंगळे पो.हे.कॉ. हे करीत आहेत.

Spread the love
[democracy id="1"]