केळी उत्पादक संघाची राईज एन शाईन. पुणे कंपनीला भेट टिशू कल्चर रोपांची घेतली माहिती
प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर कडून
महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघाचे शिष्टमंडळ पुणे येथील टिशू कल्चर रोंपांकरीता महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठ्या राईज एन शाईन या कंपनीला भेट देऊन कंपनी व त्यांचे रोपे यांची सविस्तर माहिती घेण्याकरिता पोहोचले. राष्ट्रीय केळी संशोधन संस्था तसेच जैव तंत्रज्ञान विभाग भारत सरकारकडून प्रमाणित महाराष्ट्रातील अग्रगण्य कंपनी राईज एन शाईन येथे महाराष्ट्र राज्य केळी संघाचे अध्यक्ष अध्यक्ष किरण भाऊ चव्हाण, राज्य समन्वयक सचिन पाटील कोरडे ,अतुल नाना पाटील ,राज्यात तज्ञ संचालक नामदेव वलेकर हनुमंत चिकणे या सर्व पदाधिकारी यांनी भेट दिली. यावेळी राईज एन शाईन डॉ. भाग्यश्री पी.पाटील संस्थापक, मुख्य व्यवस्थापकीय संचालक,अमेय डी. पाटील फार्म ऑपरेशन्स मॅनेजर, पंडित कोंढारे मार्केटिंग मॅनेजर, ऑपरेशन्स अँड बिजनेस डेव्हलपमेंट , अनिल कदम टेक्निकल मॅनेजर बनाना मार्केटिंग,कु. शामल सोनवणे ,टेक्निकल को-ओर्डीनेटर बनाना मार्केटिंग यांनी सर्व शेतकरी संघाच्या पदाधिकाऱ्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तदनंतर राईज एन शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनी बद्दल माहिती देताना सांगितले की, राईज एन शाईन बायोटेक प्रा.ली. टिशू कल्चर रोपांची वैशिष्ट्ये याबाबत माहिती देताना सांगितले की , सदरहू कंपनी ही राष्ट्रीय केळी संशोधन संस्था तसेच जैव तंत्रज्ञान विभाग भारत सरकारकडून प्रमाणेच असून आंतरराष्ट्रीय दर्जाची व अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेत रोप निर्मिती होत असते. अनुवंशिक दृष्ट्या शुद्ध व उत्तम मातृ वृक्षांची सर्व गुणधर्म असलेली निरोगी रोपे, स्वयंचलित हरितगृह व पॉलिहाऊस मध्ये हार्डनिंग , माती विना माध्यमात वाढलेली समान वयाची एकसारखी ग्रेडिंग ची रोपे ज्यामुळे एकसमान वाढ व एकसमान नियोजनबद्ध कापणी शक्य होते . निर्यात क्षम गुणवत्ता व भरघोस उत्पादन देणारे केळीचे वाण ग्रंड नेंन , ये लक्की , रेड बनाना उपलब्ध आहेत. उत्तम दर्जाची केळी रोपे वर्षभर उपलब्ध व वेळेवर पुरवठा करण्यात येतो. उच्चशिक्षित ,अनुभवी केळी तंत्रज्ञान कडून शेतकऱ्यांना लागवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन उपलब्ध असते. शेतीच्या शाश्वत विकासासाठी,स्वतंत्र जैवतंत्रज्ञान संशोधन व विकास विभाग व यासाठी सातत्याने प्रयत्नशील बहुआयामी वैज्ञानिक संघ कंपनीत उपलब्ध आहेत. ही सर्व माहिती राईज एन शाईन बायोटेक प्रा.ली च्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर भाग्यश्री पी. पाटील व मुख्य व्यवस्थापकीय संचालक अमेय डी पाटील यांनी केली उत्पादक संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिली. महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघाचे अध्यक्ष किरण भाऊ चव्हाण यांनी केळी लागवडीपासून तर काढणीपर्यंत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी वर उपाययोजना याबाबत कंपनीसोबत सविस्तर चर्चा केली. व कंपनीबाबत समाधान व्यक्त केले.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)