अकोला येथे नवीन पदवी पशू वैध्यकीय महावीद्यालय2023 -24 सुरु 58.09 कोटि निधीचा अध्यादेश शासना कडुन जारी आमदार सावरकर यांचे प्रयत्नाना यश.

अकोला येथे नवीन पदवी पशू वैध्यकीय महावीद्यालय2023 -24 सुरु 58.09 कोटि निधीचा अध्यादेश शासना कडुन जारी आमदार सावरकर यांचे प्रयत्नाना यश.

बाळासाहेब नेरकर कडून

अकोला महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत अकोला येथे नवीन पदवी पशु वैद्यकीय महाविद्यालय सन २०२३-२४ वर्षापासून शैक्षणिक प्रवेश सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला असून शासनाने या साठी ५८.०९ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्याचा अद्यादेश आज शासन निर्णय क्रमांक मपवि २०१६/प्र.क्र.१४ (भाग 1) पदम २ (माफसु) काढून आमदार रणधीर सावरकर यांच्या मागणीची पूर्तता भाजपा शिवसेना सरकारने व राज्याचे मुख्यमंत्री आ एकनाथ शिंदे,उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. राधाकृष्ण विखे पाटील, यांनी केल्याबद्दल अकोलेकर व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी शासनाचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे.
राष्ट्रीय पशु विज्ञान अकादमी नवी दिल्ली या संस्थेने भारतीय कृषी अनुशंधान परिषद यांना सादर केलेल्या अहवालानुसार पशु वैद्यकीय महाविद्यालयाची गरज लक्षात घेता आमदार रणधीर सावरकर सातत्याने या साठी खासदार संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात पाठपुरावा करीत होते. तत्कालीन मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखाली भाजपा, शिवसेना युतीच्या काळात तत्कालीन अर्थमंत्री ना सुधीरभाऊ मूनगंटीवार यांनी पाच वर्षापूर्वी या संदर्भात विधिमंडळात घोषणा केली होती. परंतु दुर्दैवाने महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात प्रक्रिया थांबली होती परंतु ना. एकनाथ शिंदे व ना देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यावर आमदार सावरकर यांनी पाठपुरावा करून ना फडणवीस व ना विखे पाटील यांचे कडे मागणी केली व सरकारने १६ मे २०२३ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अकोला येथे नवीन पदवी पशु वैद्यकीय महाविद्यालय स्थापना करून पाच वर्षात ३१६.६५ कोटी रुपये खर्च करण्याची मान्यता देऊन ५६ शिक्षक, ४८ शिक्षकेतर कर्मचारी व बाह्यस्त्रोताद्वारे भरावयाची ६० पदे असे एकूण १६४ पदांना मंजुरी दिली होती. त्या अनुषंगाने एकामाहीन्याचे आत शासनाने २५ दिवसात अध्यादेश काढून पहिल्या वर्षामध्ये मिळणारा ५८.९ कोटी रुपये निधी देण्याची मंजुरी देऊन त्याची तरतूद करून अकोलेकरांना पंतप्रधान ना नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षाच्या कालखंडातील सेवा सुशासन जनकल्याण महाजन संपर्क अभियानांतर्गत मोठी भेट राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नद्डा व राज्याचे उप मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनापूर्वीच भेट दिली आहे. अकोला, वाशीम, बुलढाणा, या जिल्ह्याचे वतीने आमदार रणधीर सावरकर यांनी सरकारचे व राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, ना राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे. तसेच शासनाचे खा संजयभाऊ धोत्रे, आ गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ हरीश पिंपळे, आ वसंत खंडेलवाल, विजय अग्रवाल, अर्चनाताई मसने यांनी गतिशील व विकासशील सेवा समर्पण, लोक कल्याण व डबल इंजिन चे सरकारने शेतकऱ्यांना व आत्महत्या ग्रस्त शेतकरी जिल्ह्यांना व वर्हाडा ला न्याय दिला आहे.

Spread the love
[democracy id="1"]