मौजे मारसुळ येथे कुर्षी विज्ञान केंद्र करडा व मालेगाव तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षण संपन्न
प्रतिनिधी प्रमोद सांगळे जि.वाशिम
आज दिनांक ९जून रोज शुक्रवारी सकाळी ९वा मा श्री अंगद प्रदिपराव घुगे संरपच यांच्या अध्यक्षतेखाली मौजे मारसुळ येथील जय भोले बजरंग बली संस्थान मारसुळ येथे कुर्षी विज्ञान केंद्र करडा व मालेगाव तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षण बाबतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन श्री डी.एन.इंगोले कुर्षी अर्थशास्त्र कुर्षी विज्ञान केंद्र करडा यांनी सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी संतुलित खतांचा वापर करावा शेती वरील खर्च कमी करावा शासनाच्या पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा.व स्वछ ही सेवा या कार्यक्रमाचे गावांमध्ये नियोजन गांडूळ खत निर्मिती प्रकल्प कंपोस्ट खत निर्मिती करून शेतीमध्ये वापर करावा.सुधारित वाणाचा वापर करावा इत्यादी बाबींची माहिती देण्यात आली.व श्री व्हि के वानखेडे कुर्षी साह्यक यांनी पंतप्रधान सन्मान निधी योजना ई.के.वायशी व आधार कार्ड लिंग करणे बाबत माहिती दिली शेतकऱ्यांनी अष्टसुत्री वापर करावा व शेतकऱ्यांनी पेरणी झाली की ई पिक पाहणी करावी.पेरणी पुर्वी शेतकऱ्यांनी बियाणे उगवणं शमता तपासून पाहावी तसेच बीजप्रक्रिया करावी व पेरणी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात आले यावेळी प्रशिक्षणाला शामराव निगोते रंजन घुगे मारोतराव भेंडेकर निवासराव घुगे धन्यकुमार नागरे गोपाल निवासराव घुगे विठ्ठल रंगराव घुगे शाम राजबा घुगे उमेश तायडे मनिष घुगे मदनराव घुगे स्वप्नील काळे महादेव घुगे संदिप भेंडेकर प्रमोद जयसिंगराव सांगळे उपस्थित होते
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)