अकोट येथे आरोग्य अधिकारी कार्यालयावर आशा सेवीकेचे थाली बजाव आंदोलन
अकोट तालुका प्रतिनिधी संजय गवळी
अकोट तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा व गटप्रर्वतक यांनी अकोट तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रेता सालफळे यांच्या कार्यालयावर आपल्या रखडलेल्या कामातील मोबदला व तिन महिन्यांपासून रखडलेले मानधन त्वरित मिळावे व वाढीव मानधन यासाठी अकोट तालुक्यातील सर्व गावातील आशाताईंनी व गटप्रर्वतक यांनी थाली बजाव आंदोलन करण्यात आले.मात्र ह्या वेळी आशा यांनी आपल्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्याची मागणी केली आहे.तसेच अकोट तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रेता सालफळे ह्या आशाच्या ह्या आंदोलनाला निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित नसल्याने. सदर निवेदन प्रसाद मोडके यांनी स्विकारले.रखडलेल्या मानधन व आशाच्या विविध प्रकारच्या समस्या बाबत अकोट तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन व सुचना देऊन ही आशा यांच्या समस्या कडे लक्ष देण्यात आले नाही.तसेच आरोग्य वर्धीनी चे मानधन व आशाचे मानधन महिन्याच्या 5 तारखेच्या आत देण्यात यावे अशा अनेक समस्या चा पाढा आशा व गटप्रर्वतक यांनी वाचला या वेळी आशा व गटप्रर्वतक संघटनेच्या अकोट तालुकाध्यक्षा उज्वला डोबाळे, उपाध्यक्षा मिना गेबड, सचिव अरुणा वाकोडे, सहसचिव ललिता मोहोड,व विस्तार अधिकारी वसंत इखार,ता.आरोग्य साहाय्यक अजय मंगळे, गणेश राठोड, कल्पना भावने, मंजुषा कळसकर,रेखा अंभेरे, रंजना मंगळे,वर्षा पुनकर,वेणु चतार, वैशाली नाथे,स्वप्नाली वडतकर,दिपाली तेलगोटे, सरिता तायडे, कविता वानखडे,मिरा बदरखे,शैला खाडे, जयश्री लाहोरे, कल्पना वाघमारे, अनिता वाघमारे, कल्पना भरक्षे, सविता वाघ, रेखा तायडे,छाया धोंडेकर, सविता खडसने,सुरेखा म्हैसने,उमा वसु,उमा लबडे,सह असंख्य आशा व गटप्रर्वतक संघटनेच्या पदाधिकारी उपस्थित होते.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)