उत्तम कापूस प्रकल्प (बी.सी.आय .)अंतर्गत जैविक निविष्ठा उत्पादन केंद्राचे थाटात उद्घाटन .अमरावती.

उत्तम कापूस प्रकल्प (बी.सी.आय .)अंतर्गत जैविक निविष्ठा उत्पादन केंद्राचे थाटात उद्घाटन .अमरावती.

दर्यापूर तालुका विशेष प्रतिनिधी गौरव टोळे

येथून जवळ असलेल्या अंजनसिंगी येथे उत्तम कापूस प्रकल्प ( बीसीआय) कॉटन कनेक्ट साऊथ एशिया प्रा.लि. व विकासगंगा समाज सेवी संस्था घाटंजी याच्यां अंतर्गत जैविक निविष्ठा उत्पादन केंद्राचे उद्घाटन सुरज जी रासकर प्रोग्राम मॅनेजर कॉटन कनेक्ट .यांच्या शुभहस्ते करण्यात आले .यावेळी अंजनसिंगी येथील उपसरपंच श्री अवधूत दिवे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी दिलीप जोल्हे ग्रामविकास अधिकारी स्वातीताई कोरडे( कृषी सखी )ज्योतीताई बागडे उमेद प्रकल्प वैष्णवी तालन पियू मॅनेजर रवींद्र समर्थ जिल्हा समन्वयक विकास गंगा समाजसेवी संस्था व संजयजी घावट जैविक निविष्ठा केंद्राचे संचालक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सुरज रासकर यांनी आपल्या मार्गदर्शनात कापूस पिकावरील येणाऱ्या रोग किडी व व समस्यांबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच दशपर्णी निंबोळी अर्क वर्मी कंपोस्ट याबद्दल सखोल मार्गदर्शन केले .या वेळी बी.सी.आय. प्रकल्पातील शेतकरी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मेश्राम प्रास्ताविक वैष्णवी तालान व आभार संजय तल्हार यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता क्षेत्र प्रवर्तक प्रवीण रामटेके नितीन चौधरी निलेश पाटभजे अंकुश मोरे अतुल चौधरी व स्वप्निल दोडके यांनी अत्यंत परिश्रम घेतलेत

Spread the love
[democracy id="1"]