दहावीच्या परीक्षेत प्रगती माहोकार हिवरखेडात प्रथम
प्रतिनिधी / 5 जून बाळासाहेब नेरकर कडून
हिवरखेड :- दहावीच्या परीक्षेचा नुकत्याच निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत कुमार प्रगती गोपाल माहोकार हीने हिवरखेडातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. कुमारी प्रगती महोकार ही तळेगाव येथील राजीव गांधी विद्यालयात शिकत होती तीला दहावीच्या परीक्षेत 96•40 टक्के एवढे गुण मिळाले असून तिला मॅथेमॅटिक्स या विषयात 100 गुण मिळाले आहेत. कुमारी प्रगती महोकार ही शेतकऱ्याची मुलगी असून तिचे वडील गोपाल महोकार हे शेती करतात व त्यांची परिस्तिथी मध्यमवर्गीय आहे अश्या परिस्तितीतून कुमारी प्रगती पुढे आली असून तिचे सर्वत्र कौतून होत आहे तिच्या या घवघवीत यशा बद्दल उपसरंपच रमेश दुतोंडे, माजी सरपंच संदिप इंगळे, सदस्य रवी वाकोडे आदर्श शिक्षक महेंद्र कराळे सर, मानिष गोरद सर, रमेश व्यवहारे, आदर्श शेतकरी,लक्ष्मण धांडे यांनी कुमारी प्रगती हिच्या घरी जाऊन तिचा याथोचित सत्कार केला कुमारी प्रगती माहोकार हिला पुढे पॉलिटेक्निक करायचे असल्याचा तिचा मानस असून ती आपल्या यशाचे श्रेय पालक व शिक्षकवृंद यांना देते.