जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयात प्लास्टिक निर्मूलन कार्यक्रम

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयात प्लास्टिक निर्मूलन कार्यक्रम

 

 

५ जुन ह्या दिवशी संपूर्ण जगात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. यावर्षी पन्नासाव्या वर्षानिमित्त प्लास्टिक प्रदूषणावर उपाय हि थीम जाहीर झाली असून त्यावर संपूर्ण वर्षभर कार्यक्रम राबविले जाणार आहे. प्रत्येक व्यक्ती जवळपास वर्षाला ५०,००० पेक्षा जास्त प्लास्टिकचे कण श्वासातून शरीरात घेत असते. त्यामुळे प्लॅस्टिक हे मानवी आरोग्यास तसेच जैव विविधतेलाही अतिशय हानिकारक व धोकादायक ठरत आहे. प्लास्टिकमुळे माती प्रदूषण, पाणी प्रदूषण होऊन प्राण्यांच्या शरीरात प्लॅस्टिक गेल्यामुळे ते सुध्दा दुर्देवी मृत्यस सामोरे जात आहे. याला उपाय म्हणून प्लॅस्टिकला पर्यायी कंपोस्टेबल वस्तूंचा वापर करावा अशा तऱ्हेची जनजागृती करीत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती च्या राष्ट्रीय सेवा योजना तर्फे बाबा हॉटेल चौक ते लेखुमल चौक या परिसरातील प्लास्टिक पिशव्या, बाटल्या व इतर साहित्य जमा करून त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली.
हा कार्यक्रम श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती चे प्राचार्य डॉ. शशांक देशमुख यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्रा दिनेश देशमुख यांच्या मार्गदर्शनात प्रा. प्रहेश देशमुख, प्रा. सौ. कल्पना पाटील यांनी स्वयंसेवकांसोबत यशस्वीरीत्या राबविला.

Spread the love
[democracy id="1"]