खासदार नवनीत राणा यांनी केले उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन

खासदार नवनीत राणा यांनी केले उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय उद्घाटन सोहळा संपन्न

महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी: दि.5 जुन

अंजनगाव सुर्जी शहरात तालुक्यांतील नागरीकांच्या सुविधे साठी 50 खाटांच्या क्षमतेचे उपजिल्हा रुग्णालय व्हावे म्हणून 23 कोटी रुपये कीमतीच्या उपजिल्हा रुग्णालयाचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा आज दि.5 जुन रोजी तालुक्यातील मान्यवरांच्या व नागरीकांच्या उपस्थितीत ग्रामीण रुग्णालयाच्या परीसरात अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांचे हस्ते पार पडला.गेल्या कित्तेक वर्षान पासुन तालुक्यासाठी अत्यावश्यक असलेला व मागणी असलेल्या जिल्हा उप रुग्णालयाला पंतप्रधान जनविकास कार्यक्रमातंर्गत संचालक, आरोग्य संचालनालय यांनी अंजनगाव सुर्जी तालुक्याला ५० खाटांचे उप जिल्हा रुग्णालय बांधकामासाठी 23 कोटी इतक्या किंमतीचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला होता.परंतु दि.5 जुन ला अमरावती जिल्ह्याचे खासदार यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन सोहळा आयोजित करण्याचे जाहीर केल्या नंतर दिनांक 29 मे ला स्थानिक विश्राम भवनात आमदार बळवंत वानखडे यांनी पत्रकार परिषद घेऊन अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय व्हावे या साठी पाठपुरावा मी केला असल्याचे पत्रकारान समोर केलेल्या पाठ पुराव्याच्या कागद पत्रा निशी मांडले होते खासदार नवनीत राणा यांनी परस्पर 5 जुनला भूमिपूजनाचा कार्यक्रम करणे म्हणजे निव्वळ श्रेय लाटण्याचा प्रयत्न आहे असा आरोप त्यांनी केला होता दिनांक 1 जुन ला मी भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे असे पत्रकार परिषदेत जाहीर केल्या नंतर दिनांक 1 जुन ला त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन सोहळा पार पाडला होता परंतु आज दिनांक 5 जुन भूमिपूजन सोहळा निमित्त
खासदार नवनीत राणा यांनी बोलतांना विरोधकांवर नाव न घेता टीकास्त्र सोडले असुन बोलतांना सांगितले की केंद्राने परवानगी दिली तर आम्हीच काम मंजुर करून आणले तर परवानगी दिली नाही तर केंद्राने काम अडवून ठेवले अशा प्रकारे जनतेसमोर श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात परंतू आम्ही श्रेय न घेता ते श्रेय जनतेचे आहे जनतेने दिलेल्या आशिर्वादाचे आहे एक जिल्ह्याची लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे जनतेसाठी कार्य करणे ना की श्रेय घेणे मी जे कार्य केले हे जिल्ह्यातील , तालुक्यातील नागरीकांना माहीतच आहे आहे आणि येणाऱ्या काळात मी केलेल्या कार्याचा जोरावरच मतदारांना मत मागणार आहे असे खासदार यांनी भाषणात बोलतांना सांगितले. तालुक्यातील पदाधिकारी,कार्यकर्ते, वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरीकांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीत भूमिपूजन व उद्घाटणीय सोहळा पार पडला.

Spread the love
[democracy id="1"]