दर्यापूर तालुक्यात शेत शिवाराची कामे अंतिम टप्प्यात बी बियाणे रासायनिक खत आरक्षित करण्यावर भर

दर्यापूर तालुक्यात शेत शिवाराची कामे अंतिम टप्प्यात बी बियाणे रासायनिक खत आरक्षित करण्यावर भर

दर्यापूर तालुका विशेष प्रतिनिधी गौरव टोळे

खरीप हंगाम काही दिवसावर येऊन ठेपला आहे. पूर्वमशागतीच्या कामासह पेरणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मागील वर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने जून महिन्याच्या शेवटी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पेरणी साधल्यामुळे व यंदा मान्सून मात्र केव्हा सक्रिय होईल त्यावर पेरणी अवलंबून आहे दरम्यान, ऐनवेळी धावपळ नको म्हणून शेत शिवारात मशागतीची लगबग वाढली आहे. तर दुसरीकडे शेतकरी बि-बियाणे, खते खरेदीसाठी गर्दी करत आहेत.दर्यापूर तालुका परिसरातील शेतशिवारात सध्या मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असून पारंपारिक बैलजोडी व ट्रॅक्टर यंत्राच्या साह्याने मशागतीच्या कामानी वेग घेतला आहे. त्यात पंजी, वखरणी, मोगडा, तिरी आदीसह काडी कचरा वेचणी व शेण खत टाकणी आदी कामे होत आहेत. पिकांच्या उत्तम वाढीसाठी शेणखतही टाकण्यास पसंती दिली जात असून मजूर मिळत नसल्याने शेतकरी कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन शेतातील कामे करत आहेत. मागील वर्षी परिसरातील पेरणी साधल्यामुळे व उत्पन्नही चांगले आले होते. मात्र, यंदा मान्सूनचे आगमन वेळेपूर्वीच होणार या हवामान खात्याचा अंदाजामुळे, ऐनवेळी घाई नको म्हणून शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आनली आहेत. तर दुसरीकडे बाजारातील कृषी सेवा केंद्रावर बि-बियाणे, खते खरेदीसाठीची गर्दी होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.गेल्या वर्षी सोयाबीन बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे ऐनवेळी पाऊस होताच धावपळ नको म्हणून शेतकऱ्यांनी यंदा पेरणीपूर्व बी- बियाणे खरेदी करून ठेवण्याकडे कल वाढवला आहे .- तर शेती कामासाठी मजूर मिळत नसल्याने यांत्रिकीकरणावर भर सुद्धा शेतकरी व कास्तकारांनी दिला आहे यंदा हवामानावर आधारित पीक परिस्थिती निर्माण झाली तर शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल

Spread the love
[democracy id="1"]