विजेच्या जिवंत तरावर बैलाचा पाय पडल्याने बैल जागिच ठार.

विजेच्या जिवंत तरावर बैलाचा पाय पडल्याने बैल जागिच ठार.
नागरिकांच्या समय सुचकतेमुळे दुसरा बैल व बैलगाडी चालक वाचला.

अंजनगावसुर्जी शहर प्रतिनिधी सागर साबळे

तालुक्यातील मुऱ्हा देवी येथे
बैलगाडी घेऊन स्वतःच्या शेतात जात असताना तुटलेल्या इलेक्ट्रिकच्या जिवंत तारावर ताराला बैलाचा स्पर्श झाल्याने एक बैल जागीच ठार झाला असून सुदैवाने बैलगाडी चालवणारा शेतकऱ्याला कुठलीही इजा झाली नाही. आज (दि ४) ला सकाळी ८वाजता दरम्यान घडली.मोहम्मद जमीर मोहम्मद हनीफ सौदागर वय ४० रा. मुऱ्हा देवी हा दादाराव उमक यांच्या शेतात आपल्या स्वतःच्या बैलगाडीने स्पिंकलर चे पाईप घेऊन जात असताना रात्री हवेमुळे तुटून पडलेले विजेचे तार न दिसल्याने आणि तारा मध्ये विजेचा प्रवाह सुरू असल्याने बैलाचा पाय वीज प्रवाह सुरू असलेल्या तारावर पडला ज्यामुळे बैलबंडीचा एक बैल जागीच ठार झाला सुदैवाने बैलगाडी चालवणाऱ्या धुरकऱ्याच्या पायामध्ये प्लास्टिकची चप्पल असल्याने विजेच्या धक्क्याने तो दूर फेकला गेला आणि त्याचे उपस्थित असलेल्या नागरिकांनी लगेचच एका बैलाचा दोर कापून त्याला बाहेर खेचले बैलगाडी वरून उडी धुरकरी बैलगाडी वरून फेकल्या गेल्याने त किरकोळ जखमी झाला आहे . बैल बंडीच्या भरोशावर उदरनिर्वाह असलेल्या मोहम्मद जमीर मोहम्मद हनीफ सौदागर या मोलमजुरी करणाऱ्या शेत कष्टकऱ्याची अंदाजे किंमत 70 ते 80 हजार रुपये असलेला बैल मृत्युमुखी पडला आहे . त्यामुळे सौदागर यांचे आर्थिक कमावण्याचे साधन गेले आहे ही घटना आज दि. ४ रोजी सकाळी ८ वाजता घडली तेव्हा नागरिकांनी सावरासमोर केली व तसेच सौदागर यांना रुग्णालयात नेले तसेच तिथे कुंभारगाव येथील काही टेक्निशियन आले असता त्यांना प्रतिनिधी विचारले असता शुभम कुऱ्हाडे यांनी सांगितले की रात्रीला काहीतरी पार्किंग झाल्या असल्यामुळे हि तार तुटली असावी असा अंदाज त्यांनी सांगितला त्यावर विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. मृत पडलेल्या बैलाची किंमत वीज वितरण कंपनीने संबंधित शेतकऱ्याला देण्याची मागणी मुऱ्हा देवी येथील नागरिकांकडून होत आहे.

Spread the love
[democracy id="1"]