रविवारी हिवरखेड येथे सत्कार समारंभाचे आयोजन
हिवरखेड- बाळासाहेब नेरकर कडून
मूळ हिवरखेड येथील असलेले व सध्या अकोला येथे वास्तव्यास असलेले डॉ.राजेंद्र बाळकृष्ण सोनोने,डॉ.अंजली राजेंद्र सोनोने व श्रीमती सुरेखाताई दिलीप सोनोने या एकाच कुटुंबातील तिघांनी वयाची पन्नाशी पार केल्यावर जगातील कठीण समजल्या जाणाऱ्या माउंट एव्हरेस्ट शिखराचा बेस कॅम्प सर केला त्यांच्या या अभूतपूर्व कामगिरीने अकोल्या जिल्ह्याचेच नव्हे तर हिवरखेडचा सुद्धा नावलौकिक वाढला.त्यांच्या या यशाबद्दल सोनोने परिवारातील वरील त्रिमूर्तींचा तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती तेल्हाराच्या सभापतिपदी नुकतीच हिवरखेड येथील सुनिल मोतीरामजी इंगळे यांची निवड झाली याबद्दल आम्ही हिवरखेडकर ग्रुपच्या वतीने स्थानिक श्री विठ्ठल मंदिर संस्थान येथे रविवार दि.४ जून रोजी संध्याकाळी ठीक ७.३० वा.वरील मान्यवरांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात सौ.उषा प्रदिप भोपळे यांच्या चंद्राचे घर या काव्य संग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध कवी व सूत्रसंचालक ऍड.अनंत खेडकर यांच्या हस्ते होणार आहे.सोबतच रसिकांना मान्यवरांच्या मार्गदर्शनासोबतच ऍड.अनंत खेडकर यांच्या कविता आणि खुमासदार किस्याची मेजवानी मिळणार आहे .तरी गावातील व परिसरातील लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आम्ही हिवरखेडकर ग्रुपने केले आहे.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)