संजय गांधी निराधार योजना,कुटुंब आर्थिक सहाय्य योजना,राशन कार्ड वरील उत्पन्नाची अट रद्द करून लाभार्थ्यांना न्याय द्यावा डॉ अशोक ओळंबे
हिवरखेड प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर
मा जिल्हाधिकारी मार्फत पालकमंत्री अकोला जिल्हा मा देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना दिले निवेदन
अकोला कुटुंब सहाय्य
योजनेअंतर्गत अनेक विधवा लाभार्थ्यांना २ वर्षापासून वेतन मिळाले नसून प्रलंबित वेतन लाभार्थ्यांना तात्काळ मिळावे,
तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे लाभार्थ्यांचे बँक खाते क्रमांक व आयएफसी कोड चुकीच्या पद्धतीने टाकल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना अनुदान मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत बहुतांश लाभार्थ्यांना जवळपास ७ ते ९ महिने पासून अनुदान मिळत नसल्यामुळे त्यांना तहसील कार्यालयामध्ये चकरा मारत पायपीट करावी लागत आहे हे कितपत योग्य आहे असा सवाल डॉ अशोक ओळंबे यांनी निवेअबदन देते वेळी विचारला. तसेच सामाजिक न्याय विभाग अंतर्गत संजय गांधी निराधार योजनेसाठी राशन कार्ड वरील उत्पन्न ग्राह्य मानण्यात येते ही अट रद्द करून तहसीलदार यांचे उत्पन्नाचा दाखला ग्राह्य ठरविण्यात यावा असे निवेदन देतेवेळी भाजपा नेते, प्रदेश निमंत्रित सदस्य डॉ अशोक ओळंबे यांनी सांगितले, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी पात्रता प्राप्त लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात जमा केलेले प्रस्ताव गहाळ होत असल्यामुळे अनेक लाभार्थी अनुदानापासून वंचित राहत आहेत यासाठी खाबुगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य समज देऊन लाभार्थ्यांना न्याय देण्याचे विनंती माननीय जिल्हाधिकारी यांचे मार्फत पालकमंत्री अकोला नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये अधोरेखित करण्यात आली. यावेळी सुरेश ठाकरे संजय चौधरी धनंजय गिरधर सचिन पाटील नारायण उंबरकर आशुतोष काटे मंगलाताई खाडे रमेश शिरसाट प्रकाश गवार गुरु सुरेश अंधारे श्रीकांत एखंडे प्रकाश वानखडे गजानन गोलाईत संजय लाडवीकर किशोर वळतकर पवन सुर्वे निलेश तायडे विपिन ढोरे शेखर शेळके दीपक गवारे गणेश मानकर राम खरात बालू खडसे यांचे सह बहुसंख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)